भल्या पहाटे कणकवलीतील रामेश्वर प्लाझा इमारतीत भरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 03:33 PM2021-06-16T15:33:45+5:302021-06-16T15:40:37+5:30

Kankavli Rain Sindhudurg : गेले 3 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आपला जोर वाढविला असून कणकवली शहरात सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे ४ वाजता रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पाणी भरले.

Good morning in Rameshwar Plaza building in Kankavali | भल्या पहाटे कणकवलीतील रामेश्वर प्लाझा इमारतीत भरले पाणी

भल्या पहाटे कणकवलीतील रामेश्वर प्लाझा इमारतीत भरले पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देभल्या पहाटे कणकवलीतील रामेश्वर प्लाझा इमारतीत भरले पाणी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केली ऑन द स्पॉट पाहणी

कणकवली : गेले 3 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आपला जोर वाढविला असून कणकवली शहरात सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे ४ वाजता रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पाणी भरले.

गेले तीन-चार दिवस कोसळणार्‍या पावसामुळे मोठ्या प्रमाणात लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आले होते. मात्र गोकुळधाम हॉटेलच्या बाजूला पाणी विसर्ग होत असलेल्या तोंडावर महामार्ग ठेकेदारांने सेंट्रींग साहित्य न काढल्यामुळे पुन्हा एकदा पाणी तुंबले.

इमारतीच्या तळमजल्यावर सारस्वत बँक एक हॉटेल व निवासी संकुल असल्याने काही भागात पाणी गेल्यामुळे मोठे नुकसान झाले. तळमजल्याला पाणी भरल्याने जीव मुठीत धरुन आपली वाहने पार्किंग मधून बाहेर काढली. लगेचच वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

जवळील नाल्याचे पाणी नाल्या मधून बाहेर पडत बिल्डिंगच्या तळमजल्यावर आले पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिथे असणारा डायनिंग हॉल दुकाने तसेच घरामध्ये सर्वच ठिकाणी तळमजल्याला पाणी साचले यावेळी लगेचच तेथील रहिवाशांनी स्थानिक प्रशासन म्हणजे तहसीलदार कार्यलय, नगरपंचायत यांना कळवले व आपली वाहने तिथून सुरक्षित ठिकाणी लावली पण सकाळी सात वाजेपर्यंत पाणी ओसरले तरीही कोणतीही प्रकारची आपत्कालीन मदत येथे उपलब्ध न झाल्याने तेथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

यावेळी संजय राणे, अमोल कोळी, अशोक कदम ,पांडुरंग कुलकर्णी, अरुण चव्हाण, सुभाष सावंत, माधव कदम, सुनील कदम, अमित दळवी उपस्थित होते.

महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्षमुळे पाणी थेट रामेश्वर प्लाझा इमारतीमध्ये घुसल्याने वाहने पाण्यात अडकली होती. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार दिलीप बिल्डकॉन यांच्या गलथान कारभाराचा कणवलीकरांना यावर्षी पुन्हा त्रास भोगावा लागला आहे.

कणकवली महामार्ग उड्डाणपुलाचे काम आटोपल्यानंतर कणकवली शहरातील गटारे व नाले विसर्ग चांगल्या पद्धतीने करण्याची गरज होती. मात्र ठेकेदार कंपनीने काम संपल्याने काढता पाय घेतला आहे. त्याचा फटका या ठिकाणी पहिल्याच पावसात या भागातील नागरिकांना बसला आहे. त्याचबरोबर अन्यही कणकवली शहरातील नाले गटारे अर्धवट टाकून बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला आहे.

अनेकदा सत्ताधारी व विरोधकांनी आवाज उठवून देखील त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवत आहे. पावसाच्या सुरवातीलाच अशी अवस्था होत असेल तर पुढील दिवसात काय होईल याची चिंता सतावू लागली आहे. गत वर्षी पावसाच्या पाण्याने नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान केले होते.त्यामुळे निदान यावर्षी तरी काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केली ऑन द स्पॉट पाहणी

 कणकवली शहरातील रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पहाटे पाणी भरल्याचे समजल्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी नाल्याची पाहणी केली.

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अधिकारी सलीम शेख यांच्याशी चर्चा करत नाल्यातुन पाण्याचा विसर्ग होत नसल्याची समस्या तातडीने सोडवा,अशी मागणी केली.तर नगरपंचायतच्यावतीने हॉटेल गोकुळधाम येथील अडकलेली सेन्ट्रीगच्या फळ्या हटविण्यात आल्या आहेत.

कणकवली शहरातील अन्य काही ठिकाणी पाण्याचा विसर्ग होत नसल्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्या ठिकाणची पाहणी नगरपंचायतच्यावतीने करण्यात आली. त्याचबरोबर ज्या समस्या कणकवली शहरात आहेत, त्या संदर्भात महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार यांनी तातडीने कारवाई करत प्रश्न निकाली करण्याची मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सलीम शेख यांच्याकडे केली आहे.यावेळी गटनेते संजय कामतेकर,अजय गांगण व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Good morning in Rameshwar Plaza building in Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.