Goa seized illegal illicit liquor by bus; One person in custody | आराम बसमधून गोवा बनावटीची अवैध दारू जप्त; एक जण ताब्यात
आराम बसमधून गोवा बनावटीची अवैध दारू जप्त; एक जण ताब्यात

ठळक मुद्देआराम बसमधून गोवा बनावटीची अवैध दारू जप्तकणकवली पोलिसांच्या एक जण ताब्यात ; १४ हजार १५० रुपये किमतीचा माल


लोकमत न्यूज नेटवर्क

कणकवली : गोव्याहून पुणे येथे जाणार्‍या नीता कंपनीच्या आराम बस मधून १४ हजार १५० रुपयांची गोवा बनावटीची दारू अवैधरित्या वाहतूक करताना कणकवली पोलिसांनी ती जप्त केली आहे. गुरुवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास कणकवली एस.एम.हायस्कूल येथे महामार्गावर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणी खासगी आराम बसचा क्लीनर रमेश श्रीदयाराम पाल (रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. बोरिवली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आराम बसमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक होत असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कणकवलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी आपल्या सहकार्‍यांसह राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली होती. गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास गोव्याहून पुणे येथे जाणार्‍या नीता वोल्वो लक्झरी बसच्या (युपी-७५ केटी ८८८८) या गाडीच्या डिकीमध्ये एका काळ्या बॅग मध्ये गोवा बनावटीची अवैध दारू आढळून आली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली.

या अवैध दारू वाहतूक प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राकेश चव्हाण यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर अवैध दारूची वाहतूक केल्याप्रकरणी बसचा क्लीनर रमेश पाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता जामीन मिळाला आहे.
या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल भूषण सुतार, वैभव कोळी, चालक जमादार , उबाळे आदी सहभागी झाले हो


Web Title: Goa seized illegal illicit liquor by bus; One person in custody
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.