वैद्यकीय समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, काँग्रेसचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 05:30 PM2020-02-17T17:30:30+5:302020-02-17T17:31:58+5:30

मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना अद्ययावत सेवा मिळत नाहीत. रुग्णालयाला असुविधांचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य जनतेला आवश्यक त्या सेवा मिळत नसल्याने खासगी रुग्णालयात जावे लागत असून रुग्णालयाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्यमंत्री तसेच राज्यसरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांना सांगितले.

Follow-up will be made to resolve medical issues, Congress promises | वैद्यकीय समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, काँग्रेसचे आश्वासन

मालवण ग्रामीण रुग्णालयातील सुविधांबाबत काँग्रेसच्यावतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.

Next
ठळक मुद्देवैद्यकीय समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, काँग्रेसचे आश्वासन मालवण ग्रामीण रुग्णालयात असुविधांचा पाढा

मालवण : मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना अद्ययावत सेवा मिळत नाहीत. रुग्णालयाला असुविधांचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य जनतेला आवश्यक त्या सेवा मिळत नसल्याने खासगी रुग्णालयात जावे लागत असून रुग्णालयाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्यमंत्री तसेच राज्यसरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांना सांगितले.

मालवण ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचा काँग्रेस पक्षाकडून आढावा घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष बाळू अंधारी, सरचिटणीस अरविंद मोंडकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, पल्लवी तारी, सेवादलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, शहरअध्यक्ष जेम्स फर्नांडिस, सरदार ताजर, लक्ष्मीकांत परुळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. नलावडे हेही उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. रुग्ण तपासणी मशीन बंद असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. अपघातग्रस्त रुग्णावर केवळ प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय किंवा गोवा बांबुळी येथे हलविण्यात येते. त्यामुळे गंभीर जखमी रुग्णांना जीव गमवावा लागतो. रुग्णालयात औषधेही उपलब्ध नाहीत. याबाबत रुग्णालय प्रशासनाने कोणताही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे तुमच्या समस्या आमच्याकडे मांडा, आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करतो, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

रुग्णालयाला कायमस्वरूपी स्त्रीरोग तज्ज्ञ कधी देणार? शस्त्रक्रिया विभाग केव्हा सुरू करणार? गरोदर मातांसाठी खबरदारीच्या उपाययोजना कोणत्या आहेत? १०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर का उपलब्ध नसतात? असे अनेक सवाल काँग्रेसकडून डॉ. पाटील यांना करण्यात आले.



 

Web Title: Follow-up will be made to resolve medical issues, Congress promises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.