कचरा प्रकल्पातून प्रत्येकावर पाच लाखांचा पडणार बोजा : विनायक राऊत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:34 AM2019-04-22T10:34:39+5:302019-04-22T10:36:53+5:30

कणकवलीत होणारा ९०० कोटींचा कचरा प्रकल्प हा महाघोटाळा आहे. हा प्रकल्प बंद पडला तर प्रत्येक कणकवलीकराच्या डोक्यावर पाच लाख रुपये कर्जाचा बोजा पडणार आहे, असा आरोप करतानाच या कचरा प्रकल्पाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली.

 Five lakhs of rupees will be required for each from the garbage project: Vinayak Raut | कचरा प्रकल्पातून प्रत्येकावर पाच लाखांचा पडणार बोजा : विनायक राऊत 

कचरा प्रकल्पातून प्रत्येकावर पाच लाखांचा पडणार बोजा : विनायक राऊत 

Next
ठळक मुद्दे कचरा प्रकल्पातून प्रत्येकावर पाच लाखांचा पडणार बोजा : विनायक राऊत शासनाचे अनुदान लाटण्यासाठी, बँक कर्ज बुडविण्यासाठी प्रकल्प

कणकवली : कणकवलीत होणारा ९०० कोटींचा कचरा प्रकल्प हा महाघोटाळा आहे. हा प्रकल्प बंद पडला तर प्रत्येक कणकवलीकराच्या डोक्यावर पाच लाख रुपये कर्जाचा बोजा पडणार आहे, असा आरोप करतानाच या कचरा प्रकल्पाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली.

कणकवली शहरात ९०० कोटींचा कचरा प्रकल्प उभारला जात आहे. या कचरा प्रकल्पाबाबत शिवसेना-भाजप महायुतीच्या नेत्यांनी आक्षेप घेत हा प्रकल्प म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचा आरोप कणकवली येथील विजय भवनमध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

यावेळी खासदार विनायक राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजप नेते संदेश पारकर आदींनी कचरा प्रकल्पावर टीका केली. यावेळी अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, शैलेश भोगले, हर्षद गावडे, रुपेश नार्वेकर, सुजित जाधव तसेच शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विनायक राऊत म्हणाले, ए.जी.डॉटर्स या कंपनीने दिल्ली गाझियाबाद तसेच पटना आणि कणकवली येथील नगरपालिकांबरोबर कचरा प्रकल्पाबाबत करार केलेले आहेत. मात्र, हा प्रकल्प केंद्र शासनाची सबसिडी आणि बँकांचे कर्ज लाटण्यासाठी केला जात आहे.
कणकवली नगरपंचायतीने केलेल्या करारपत्रात या ९०० कोटींच्या कचरा प्रकल्पासाठी नारायण राणे कुटुंबीयांच्या अखत्यारित असलेल्या विविध आस्थापनांबरोबरच इंजिनिअरिंग कॉलेजमधून २ टन, मातोश्री वृद्धाश्रमातून ३ टन तसेच जिल्हा परिषद १२५ टन, दोडामार्ग नगरपंचायत ३ टन कचरा मिळणार असल्याची आकडेवारी समाविष्ट केलेली आहे. एवढा कचरा त्या ठिकाणाहून कसा मिळू शकेल? हे एक मोठे कोडेच आहे.

सत्य डोळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न

कणकवलीवासीयांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा चढेल. त्यामुळे जनतेला त्रास होईल अशी कोणतीही कृती त्यांच्याकडून होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येतील.  या प्रकल्पाचे सत्य आम्ही जनतेसमोर मांडत आहोत, असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले.

Web Title:  Five lakhs of rupees will be required for each from the garbage project: Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.