आनंदवाडी बंदर जेटीला मच्छिमार नौका लँडींग करा : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:06 PM2020-10-21T12:06:52+5:302020-10-21T12:10:15+5:30

आनंदवाडी बंदरजेटीला मच्छिमारी नौका लँडींग करा व प्रात्यक्षिक घ्या अशी सूचना आमदार नीतेश राणे यांनी केली. आमदार राणे यांनी देवगड येथील जेटीची पाहणी केली व संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत . आनंदवाडी बंदराच्या कठड्याची उंची वाढविल्यास त्याला मच्छिमारी नौका लागणार नाही अशी तक्रार मच्छिमारांनी आमदार नीतेश राणे यांच्याकडे केली होती.

Fishing boats land at Anandwadi port jetty: Nitesh Rane | आनंदवाडी बंदर जेटीला मच्छिमार नौका लँडींग करा : नीतेश राणे

आमदार नीतेश राणे यांनी देवगड बंदराची पाहणी केली.

Next
ठळक मुद्देआनंदवाडी बंदर जेटीला मच्छिमार नौका लँडींग करा : नीतेश राणेदेवगड जेटीची आमदार राणे यांनी केली पाहणी

देवगड : आनंदवाडी बंदरजेटीला मच्छिमारी नौका लँडींग करा व प्रात्यक्षिक घ्या अशी सूचना आमदार नीतेश राणे यांनी केली. आमदार राणे यांनी देवगड येथील जेटीची पाहणी केली व संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत .
आनंदवाडी बंदराच्या कठड्याची उंची वाढविल्यास त्याला मच्छिमारी नौका लागणार नाही अशी तक्रार मच्छिमारांनी आमदार नीतेश राणे यांच्याकडे केली होती.

आमदार राणे यांनी देवगड दौरा केला व बंदराची पाहणी केली. यावेळी मच्छिमारांनी जेटीची चार फूट उंचीची गरज असून या जेटीची उंची कमी पडेल अशी भीती व्यक्त केली होती. आमदार राणे यांनी खाडीतील असलेला गाळ काढून मच्छिमारांना नौका लँडींग करून त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. जर गरज पडली तर उंची वाढवा अशा सूचना केल्या आहेत.

मच्छिमारांना वादळातील नुकसानीपोटी ६५ लाख रुपये निधी मंजूर झाला. मात्र, त्यातील एकही पैसा मिळाला नसल्याची तक्रार स्थानिक मच्छिमारांनी केली आहे. आमदारांनी पुढील अधिवेशनात याबाबत सरकारला जाब विचारू अशा शब्दांत आश्वासन दिले आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, प्रकाश राणे, नगराध्यक्षा प्रणाली माने, उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष योगेश पाटकर संदीप साटम, ज्ञानेश्वर खवळे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Fishing boats land at Anandwadi port jetty: Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.