महसूल कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन, २00 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 03:47 PM2019-09-02T15:47:19+5:302019-09-02T15:49:32+5:30

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना सिंधुदुर्गच्यावतीने  एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. या लाक्षणिक संपाबरोबरच २०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत अनोखे आंदोलन केले.

An extraordinary movement of revenue staff, 100 officers, employees donated blood | महसूल कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन, २00 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

महसूल कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन, २00 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

Next
ठळक मुद्देमहसूल कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन२00 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना सिंधुदुर्गच्यावतीने  एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. या लाक्षणिक संपाबरोबरच २०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत अनोखे आंदोलन केले.

दरम्यान, हा एक दिवसाचा लाक्षणिक संप १०० टक्के यशस्वी झाला असल्याचा दावा या संघटनेच्यावतीने करतानाच ५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याच्या निर्णयावर ठाम असल्याचेही स्पष्ट केले आहे.

महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले असून शनिवारी राज्य संघटनेच्या आदेशानुसार एक दिवसीय लाक्षणिक संपादिवशी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे करण्यात आले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यात सहभागी होत रक्तदान करून आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबिरात पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान केले. काही अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी केली असता मधुमेह, उच्च रक्तदाब आढळून आल्याने अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना रक्तदान करण्याची इच्छा असूनही ते रक्तदान करू शकले नाहीत.

रक्तदान केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा रक्तपेढीमार्फत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले. त्याचप्रमाणे या एकदिवसीय लाक्षणिक संपादिवशी जनतेच्या झालेल्या गैरसोईबद्दल संघटनेच्यावतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेचे संतोष खरात, सत्यवान माळवे, अशोक पोळ, परमेश्वर फड, दीपक महाडिक, शिवराज चव्हाण, संभाजी खाडे, नरेंद्र एडके, स्वप्नील प्रभू, मनोज काळे, संदीप हांगे, गावकर, पाडावे असे पदाधिकारी हजर होते.

Web Title: An extraordinary movement of revenue staff, 100 officers, employees donated blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.