अखेर त्या बिबट्याचा झाला अंत, कासार्डेतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 07:44 PM2020-11-20T19:44:46+5:302020-11-20T19:45:52+5:30

leopard, forestdepartment, sindhudurgnews कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ भरवस्तीत घुसून बिबट्या विहिरीत पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ६० फूट खोल विहिरीत २० फूट पाणी असल्याने बाहेर येण्यास मिळत नसल्याने बिबट्याचा अंत झाला.

Eventually that leopard came to an end, the incident in Casarde | अखेर त्या बिबट्याचा झाला अंत, कासार्डेतील घटना

कासार्डे येथे मृत बिबट्याला वनविभागाचे कर्मचारी व नागरिकांनी विहिरीतून बाहेर काढले. यावेळी गर्दी झाली होती.

Next
ठळक मुद्देअखेर त्या बिबट्याचा झाला अंत, कासार्डेतील घटनामध्यरात्री भक्ष्याच्या शोधात आल्याचा अंदाज

तळेरे : कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ भरवस्तीत घुसून बिबट्या विहिरीत पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ६० फूट खोल विहिरीत २० फूट पाणी असल्याने बाहेर येण्यास मिळत नसल्याने बिबट्याचा अंत झाला.

हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात रविवारी मध्यरात्री पाण्यात पडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वनविभागाने मृत बिबट्यास साखळी गळ टाकून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोमवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान पोहण्यात तरबेज असलेल्या घोरपी समाजाच्या युवकांनी विहिरीत उतरुन मृत बिबट्यास बाहेर काढून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.

भरवस्तीत बिबट्या आढळण्याच्या घटनेत वाढ होत आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. असाच प्रकार कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ घडला. अतुल मुंडले यांच्या परसबागेतील विहिरीत बिबट्या पडल्याचा प्रकार रविवार सकाळी उघडकीस आला. मुंडले कुटुंबीय विहिरीकडे गेले असता विहिरीतून काहीतरी आवाज येत असल्याचा संशय त्यांना आला.

यानंतर विहिरीत कोणते तरी जनावर पडल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजाऱ्यांनी पाहिले असता बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसले
त्यानंतर मुंडले यानी सरपंच बाळाराम तानावडे, पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर व वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत घटनेची माहीती दिली. त्यानी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून बिबट्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, यात यश आले नाही. यात बिबट्याचा अंत झाला.

 

Web Title: Eventually that leopard came to an end, the incident in Casarde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.