संपूर्ण जिल्हा सीसीटीव्ही नियंत्रणाखाली, सिंधुदुर्ग राज्यात पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 06:13 PM2020-07-29T18:13:00+5:302020-07-29T18:23:55+5:30

संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाल्याचे कौतुक आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

The entire district is under CCTV control, first in the state of Sindhudurg | संपूर्ण जिल्हा सीसीटीव्ही नियंत्रणाखाली, सिंधुदुर्ग राज्यात पहिला

संपूर्ण जिल्हा सीसीटीव्ही नियंत्रणाखाली, सिंधुदुर्ग राज्यात पहिला

googlenewsNext
ठळक मुद्देसंपूर्ण जिल्हा आला सीसीटीव्ही नियंत्रणाखालीसिंधुदुर्ग राज्यात पहिला: देशमुख

सिंधुदुर्ग : संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाल्याचे कौतुक आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. जिल्ह्यातील सीसीटीव्ही सनियंत्रण योजनेचे गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आॅनलाईन लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या सोहळ्यास खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम हे जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये उपस्थित होते. तर आमदार दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे यांच्यासह सर्व नगराध्यक्ष, पोलीस ठाण्याचे प्रमुख आॅनलाईन उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सर्वांचे स्वागत केले व शेवटी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांनी केले. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील महिला अधिक सुरक्षित होतील, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

पोलीस, महसूल, आरोग्य यंत्रणेचे कौतुक : देशमुख

जिल्ह्याचे आजी व माजी दोन्ही पालकमंत्र्यांनी चांगले काम केले असल्याचे सांगून गृहमंत्री पुढे म्हणाले की, गुन्हेगारी कमी करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्ता राखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे हे अतिशय उपयुक्त आहेत. सध्याच्या कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील पोलीस दल, महसूल यंत्रणा, आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. त्यांच्या कामाचे मला कौतुक आहे, असेही ते म्हणाले.

गुन्हेगारी कमी होण्यास मदत : उदय सामंत

डीपीडीसीमधून मिळालेल्या निधीचा सदुपयोग जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चांगल्याप्रकारे केला आहे. ही यंत्रणा जिल्ह्यासाठी नक्कीच वरदान ठरणार आहे. गुन्हेगारी कमी करण्यासोबतच यामुळे जिल्ह्याच्या विकासालाही चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न : केसरकर

आमदार दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्ममातून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचेही सांगितले.

चांगल्या कामासाठी सर्वांनी एकत्र यावे : नीतेश राणे

आमदार नीतेश राणे यांनीही यावेळी पोलीस दलाचे अभिनंदन केले. अशा चांगल्या कामांमुळे जिल्ह्यातील सर्वांनी एकत्र काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: The entire district is under CCTV control, first in the state of Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.