' डेल्टा प्लस 'चा रुग्ण झालाय ठणठणीत बरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 12:57 PM2021-06-24T12:57:28+5:302021-06-24T13:00:19+5:30

CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली शहरात परबवाडी येथे डेल्टा प्लसचा सापडलेला रुग्ण हा उपचारानंतर बरा झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कणकवली नगरपंचायत हा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क असून, नगरपंचायतीने सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

Delta Plus patient has been cured! | ' डेल्टा प्लस 'चा रुग्ण झालाय ठणठणीत बरा !

' डेल्टा प्लस 'चा रुग्ण झालाय ठणठणीत बरा !

Next
ठळक मुद्दे'डेल्टा प्लस'चा रुग्ण झालाय ठणठणीत बरा !कणकवलीवासियांनी घाबरू नये ; नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन

कणकवली : कणकवली शहरात परबवाडी येथे डेल्टा प्लसचा सापडलेला रुग्ण हा उपचारानंतर बरा झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कणकवली नगरपंचायत हा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क असून, नगरपंचायतीने सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

डेल्टा प्लस चा रुग्ण महिन्याभरापूर्वी पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र तो रुग्ण ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहत आहे , तिथे कोविडच्या संसर्गाचा प्रसार झालेला नसल्याचेही नलावडे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कणकवली नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्याकडून सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.

त्या कॉम्प्लेक्समधील नागरिकांचे स्वॅब घेण्यात येत असून, कॉम्प्लेक्स मधील प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रीनिंग व ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यात येत आहे. तो रुग्ण पूर्ण उपचारा नंतर ठणठणीत बरा झाला आहे. कणकवली नगरपंचायत, आरोग्य विभाग व महसूल विभाग यांच्याकडून नियमित आढावा घेण्यात येत असून परबवाडीच्या त्या भागातील लोकांची आरोग्य विषयक माहितीही संकलित करण्यात येत आहे. त्यामुळे कणकवली शहरातील नागरिकांनी कोविडच्या त्रिसूत्रीचे पालन करत मास्क वापरणे, वारंवार हात धुणे,

सोशल डिस्टन्सिंग

पाळणे याची काटेकोर अंमलबजावणी करावी. असे आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले आहे.
 

Web Title: Delta Plus patient has been cured!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.