Maharashtra Vidhan Sabha 2019 : शक्ती प्रदर्शन टाळत दीपक केसरकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:44 PM2019-10-03T12:44:06+5:302019-10-03T12:48:34+5:30

शक्ती प्रदर्शन टाळत शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे सादर केला.

Deepak Kesarkar filed his nomination form | Maharashtra Vidhan Sabha 2019 : शक्ती प्रदर्शन टाळत दीपक केसरकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

Maharashtra Vidhan Sabha 2019 : शक्ती प्रदर्शन टाळत दीपक केसरकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

Next
ठळक मुद्देशक्ती प्रदर्शन टाळत दीपक केसरकर यांनी भरला उमेदवारी अर्जकुडाळात वैभव नाईकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

सावंतवाडी : शक्ती प्रदर्शन टाळत शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे सादर केला.

अर्ज भरल्यानंतर मात्र ते बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला संबोधन करणार आहेत. यावेळी त्यांची पत्नी पल्लवी केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते,शंकर कांबळी, राजन पोकळे, शैलेश परब,रमेश गावकर, बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.

वैभव नाईकांचे कुडाळात जोरदार शक्तीप्रदर्शन

कुडाळ : येथील अनंत मुक्ताई येथे कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष वैभव नाईक जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. शिवसेनेकडून त्यांना अधिकृत तिकीट मिळाल्यानंतर शक्तिप्रदर्शन करून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यावेळी सर्व शिवसैनिक शिवसेनचे चिन्ह असलेले झेंडे व टोप्या घालून आपली मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे. खासदार विनायक राऊत, विधानसभा संपर्कप्रमुख गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपसभापती श्रेया परब, सभापती राजंन जाधव, मंदार शिरसाट राजू कविटकर कुडाळ तालुका अध्यक्ष राजन नाईक, भाई गोवेकर, आदी पदाधिकारी उपस्थित आहेत.

 

Web Title: Deepak Kesarkar filed his nomination form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.