जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 03:47 PM2020-09-26T15:47:28+5:302020-09-26T15:49:03+5:30

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ करून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी प्रशासनाकडे प्रसिध्दीपत्रकातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असेही सांगितले.

Declare a wet drought by panchnama | जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा

Next
ठळक मुद्दे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा : रणजित देसाई यांची मागणी

कुडाळ : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ करून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी प्रशासनाकडे प्रसिध्दीपत्रकातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असेही सांगितले.

या प्रसिध्दीपत्रकात रणजित देसाई यांनी नमुद केले की, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे भात शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी तर अक्षरश: कुजायला लागली आहे.

कोरोनाच्या कालावधीत अनेक सुशिक्षित बेरोजगार, चाकरमानी व शेतकरीवर्गाने आत्मनिर्भर होण्याच्यादृष्टीने वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमिनीवर शेती केली होती. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भात शेती मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती.

जिल्ह्यातील शेतकरी हा आपल्याला संपूर्ण वर्षभर लागणारे तांदूळ व इतर धान्य हे स्वत:च्या शेतातच पिकवतात व त्यावर त्यांची गुजराण चालते. स्वत:चा उदरनिर्वाह करता लागणारे धान्य राखून उर्वरित सर्व धान्य हे विक्री करून त्यातच त्यांचा वर्षभराचा संसार चालतो. मात्र दुदैर्वाने गेल्या महिन्याभरात वारंवार होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या सर्वांचे तोंडचे पाणी पळाले आहे.
त्यामुळे शासनाने तातडीने या सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.

Web Title: Declare a wet drought by panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.