वालावल येथे राहत्या घरावर माड पडून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 06:48 PM2021-04-16T18:48:24+5:302021-04-16T18:49:30+5:30

Kudal Rain Sindhdurg : गेल्या दोन दिवसांपूर्वी अचानक आलेल्या विजेच्या कडकडांसह पावसामुळे वालावल कोडबसवाडी येथील रघुनाथ चंद्रकांत हळदणकर यांच्या राहत्या घरावर माड पडून घर पूर्णतः जमीनदोस्त झाले आहे. शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली आहे.

Damage to house in Walawal | वालावल येथे राहत्या घरावर माड पडून नुकसान

वालावल येथे राहत्या घरावर माड पडून नुकसान

Next
ठळक मुद्देवालावल येथे राहत्या घरावर माड पडून नुकसानशासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी

कुडाळ : गेल्या दोन दिवसांपूर्वी अचानक आलेल्या विजेच्या कडकडांसह पावसामुळे वालावल कोडबसवाडी येथील रघुनाथ चंद्रकांत हळदणकर यांच्या राहत्या घरावर माड पडून घर पूर्णतः जमीनदोस्त झाले आहे. शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली आहे.

रघुनाथ हळदणकर यांचे वडील गेल्या तीन वर्षांपूर्वी ओरोस येथे जैतापकरच्या माड बागायतीमध्ये नारळ पाडण्याचे काम करताना माडावरून पडून मृत्यू पडले होते, तर रघुनाथ हळदणकर सध्या कुडाळ तहसीलदार यांच्या गाडीवर रोजंदारीवर ड्रायव्हर म्हणून काम करीत असतात. त्यांची आई आजारपणामुळे घरातच असते.

अगदी हलाकीचे जीवन जगत असताना गेल्या सोमवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अचानक घरावर माड कोसळला. यावेळी त्याची आई बालंबाल वाचली, राहत्या घराचे होत्याचे नव्हते झाले आहे.

Web Title: Damage to house in Walawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.