CoronaVirus Lockdown : कणकवलीतील बाजारपेठ राहणार बंद, पोलीस प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 03:06 PM2020-04-25T15:06:50+5:302020-04-25T15:08:34+5:30

कणकवली शहरातील पूर्ण बाजारपेठ  बंद राहणार असून औषधांची दुकाने वगळता सर्व दुकानांसह भाजी विक्रीही बंद ठेवण्याचा निर्णय कणकवली व्यापारी संघ, नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या घेतला आहे.

CoronaVirus Lockdown: The market in Kankavali will remain closed, an important decision of the police administration | CoronaVirus Lockdown : कणकवलीतील बाजारपेठ राहणार बंद, पोलीस प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कणकवलीतील बाजारपेठ मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेताना व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, किशोर धुमाळे उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकणकवलीतील बाजारपेठ राहणार बंद, पोलीस प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णयनगरपंचायत, व्यापारी संघ सहभागी 

कणकवली : कणकवली शहरातील पूर्ण बाजारपेठ  बंद राहणार असून औषधांची दुकाने वगळता सर्व दुकानांसह भाजी विक्रीही बंद ठेवण्याचा निर्णय कणकवली व्यापारी संघ, नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या घेतला आहे. व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, किशोर धुमाळे यांनी चर्चेअंती निर्णय घेतला.

मंगळवार आठवडा बाजार बंद असूनही २१ एप्रिल रोजी बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी झाली होती. त्यावेळी सोशल डिस्टन्स न पाळता बेजबाबदार वर्तन नागरिकांकडून झाले होते. अखेर गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सकाळपासून पोलिसांनी कडक भूमिका घेतली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती.

वारंवार आवाहन करूनही नागरिक बाजारपेठेत गर्दी करीत असल्यामुळे आठवडा बाजारादिवशी पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २८ एप्रिलपासून लॉकडाऊन संपेपर्यंत दर मंगळवारी औषधांची दुकाने वगळता कणकवली बाजारपेठ बंद राहील, अशी माहिती कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत यांनी दिली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, मनोज धुमाळे आदी उपस्थित होते.


 

Web Title: CoronaVirus Lockdown: The market in Kankavali will remain closed, an important decision of the police administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.