CoronaVirus : सिंधुदूर्ग जिल्ह्यात अखेर कोविड लॅबला मंजूरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:08 PM2020-05-30T17:08:00+5:302020-05-30T17:09:14+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी अखेर कोविड -१९ तपासणी लॅब मंजूर करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असलेला निधी हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च करण्यात येणार आहे.याबाबतची माहीती आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिली.

CoronaVirus: Covid Lab finally approved in Sindhudurg district! | CoronaVirus : सिंधुदूर्ग जिल्ह्यात अखेर कोविड लॅबला मंजूरी !

CoronaVirus : सिंधुदूर्ग जिल्ह्यात अखेर कोविड लॅबला मंजूरी !

Next
ठळक मुद्देसिंधुदूर्ग जिल्ह्यात अखेर कोविड लॅबला मंजूरी !वैभव नाईक यांचा माहीती; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून होणार खर्च

कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी अखेर कोविड -१९ तपासणी लॅब मंजूर करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असलेला निधी हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च करण्यात येणार आहे.याबाबतची माहीती आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिली.

कणकवली येथील विजयभवन मध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संदेश पारकर, अतुल रावराणे, सुशांत नाईक आदी उपस्थित होते. यावेळी वैभव नाईक म्हणाले, रॅपिड टेस्टची देखील मशिनरी सोमवारी जिल्ह्यात दाखल होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत , आमदार दीपक केसरकर तसेच आम्ही केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे.

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालय परिसरात ही लॅब सुरू होणार आहे. पुढील २५ दिवसात लॅब प्रत्यक्षात सुरू होईल. या लॅबसाठी लागणाऱ्या मशिनरी खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच रुग्णांच्या सेवेत कोविड -१९ तपासणी लॅब रुजू होईल.

विरोधकांनी आता तरी राजकारण थांबवावे !

कोविड -१९ तपासणी लॅबवरून गेले काही दिवस विरोधकांनी राजकारण सुरू केले होते. आरोप प्रत्यारोप सुरू होते. ते आता तरी त्यांनी थांबवावे. असेही वैभव नाईक यावेळी म्हणाले.

Web Title: CoronaVirus: Covid Lab finally approved in Sindhudurg district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.