corona virus sindudurg : नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी : के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:10 PM2021-04-02T16:10:57+5:302021-04-02T16:12:30+5:30

CoronaVirus collector sindhudurg-सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ मार्च रोजी एकाच दिवशी ८४ कोरोना रुग्ण वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी बोलत होत्या.

corona virus sindudurg: Citizens should be more vigilant: K. Manjulakshmi | corona virus sindudurg : नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी : के. मंजुलक्ष्मी

corona virus sindudurg : नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी : के. मंजुलक्ष्मी

Next
ठळक मुद्देनागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी : के. मंजुलक्ष्मी कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता काळजी घ्यावी

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ३१ मार्च रोजी एकाच दिवशी ८४ कोरोना रुग्ण वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी बोलत होत्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, वैशाली राजमाने यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. सुपर स्पेडर्सच्या बाबतीतही संपर्कातील व्यक्तींचा जलदगतीने शोध घेऊन त्यांचीही आरटीपीसीआर टेस्ट करण्यात यावी.

गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी मास्क व सुरक्षित अंतराची अंमलबजावणी कडक करण्यात यावी. ऑक्सिजनचा पुरवठा अखंडित राहील, याची दक्षता घेण्यात यावी. कंटेनमेंट झोनमधील सर्व्हिलन्स वाढवावा. सर्व प्रांताधिकारी यांनी गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे यांसारख्या कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असल्याने नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी केले.

संपर्कातील व्यक्तींचा शोध घ्यावा

जिल्ह्यात कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, असे सांगून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवावी व ती कार्यान्वित करण्यात यावीत. खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेविषयी खासगी रुग्णालयांशी चर्चा करून त्याचे नियोजन करावे. रुग्णालयातील बिलांची तपासणी करणारे पथक पुन्हा कार्यान्वित करण्यात यावे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करावी. संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेण्यात यावा.

Web Title: corona virus sindudurg: Citizens should be more vigilant: K. Manjulakshmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.