corona virus -म्हापण येथील गुढीपाडवा उत्सव कोरोनामुळे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 05:28 PM2020-03-20T17:28:53+5:302020-03-20T17:36:33+5:30

म्हापण येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरात गुढीपाडवा निमित्त होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरविण्यात येणार नसून या गुढीपाडवा उत्सवाप्रसंगी मंदिरात होणारे पांरपारिक व धार्मिक विधी साजरे केले जाणार असून यावेळी देवस्थान संबंधित मानकरी व सेवेकरी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकातून शांतादुर्गा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शामसुंदर ठाकूर यांनी दिली.

corona virus - The Gudi Padwa festival here is canceled because of the corona | corona virus -म्हापण येथील गुढीपाडवा उत्सव कोरोनामुळे रद्द

corona virus -म्हापण येथील गुढीपाडवा उत्सव कोरोनामुळे रद्द

googlenewsNext
ठळक मुद्देम्हापण येथील गुढीपाडवा उत्सव कोरोनामुळे रद्दभक्तगणांनी व ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात गर्दी करु नये

म्हापण : म्हापण येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरात गुढीपाडवा निमित्त होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरविण्यात येणार नसून या गुढीपाडवा उत्सवाप्रसंगी मंदिरात होणारे पांरपारिक व धार्मिक विधी साजरे केले जाणार असून यावेळी देवस्थान संबंधित मानकरी व सेवेकरी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकातून शांतादुर्गा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शामसुंदर ठाकूर यांनी दिली.

प्रतिवर्षाप्रमाणे श्री देवी शांतादुर्गा मंदिरात २५ मार्च रोजी गुढीपाडवा उत्सव साजरा होणार होता. परंतु कोरोना पार्श्वभूमीवर म्हापण येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरात २५ मार्च रोजी होणारा गुढीपाडवा उत्सव मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय श्री देवी शांतादुर्गा देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.

या दिवशी मंदिरात होणारे पारंपारिक व धार्मिक विधी साजरे केले जाणार असून यावेळी देवस्थान संबंधित मानकरी व सेवेकरी उपस्थित राहणार आहेत. यावेळी बाहेरगावच्या व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी व दुकानदारांनी सदर उत्सवास उपस्थित राहू नये.

भक्तगणांनी व ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात गर्दी करु नये, तसेच या उत्सवासाठी मुंबई तसेच इतर शहरातून व गावातून येणाऱ्या भाविकांनी या काळात येण्याचे टाळावे. या उत्सवातील इतर सर्व कार्यक्रम होणार नाहीत याची नोंद घ्यावी. असे आवाहन शांतादुर्गा देवस्थान ट्रस्ट, म्हापणचे अध्यक्ष शामसुंदर ठाकूर यांच्यावतीने करण्यात आले आहे. शासन पातळीवरून देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: corona virus - The Gudi Padwa festival here is canceled because of the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.