आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 07:59 PM2020-12-19T19:59:51+5:302020-12-19T20:01:55+5:30

ZpElecation Sindhudurng Shivsena- कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा आहे, त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी केले. ते मळगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

Colorful training for the upcoming Zilla Parishad elections: Vinayak Raut | आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम : विनायक राऊत

शिवसेनेची आढावा बैठक विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अरुण दुधवडकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, विक्रांत सावंत, जान्हवी सावंत उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देआगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम : विनायक राऊत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर भगवा फडकवा, भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीने काम करा.

कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा आहे, त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी केले. ते मळगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

यावेळी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, महिला प्रमुख जान्हवी सावंत, राज्य माथाडी जनरल कामगार संघटना सरचिटणीस प्रशांत कोठावळे, दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा परिषद सदस्या संपदा देसाइ, धनश्री गवस, श्रेयाली गवस, विनिता घाडी, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, महिला तालुका संघटक अपर्णा कोठावळे, रश्मी माळवदे, अ‍ॅड. नीता सावंत-कविटकर, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब आदी उपस्थित होते.

ही निवडणूक म्हणजे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम असल्याने सर्वांनी जबाबदारीने काम करून सर्व ग्रामपंचायती सेनेकडे आणण्यासाठी कामाला लागा, असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, एकनाथ नारोजी, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, अर्चना पांगम, नारायण राणे, तालुका संघटक संजय गवस, दौलत राणे, गोपाळ गवस, संदीप कोरगावकर, लक्ष्मण आयनोडकर, विजय जाधव, मिलिंद नाईक, संतोष मोरये, भिवा गवस, राजू शेटकर, योगेश नाईक उपस्थित होते.

ग्रामपंचायत पातळीवर निवडणूक एकसंघ

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे गावाचा विकास करत असताना या निवडणुकीवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. मागील पाच वर्षात पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे व आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गतिमान विकास साधत असून, आपले राज्य हा प्रचार जनमानसात करा असे खासदार राऊत म्हणाले. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असल्याने ग्रामपंचायत पातळीवर निवडणुका एकसंघ लढविण्यास खासदार विनायक राऊत यांनी अनुमती दिली.
 

Web Title: Colorful training for the upcoming Zilla Parishad elections: Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.