कोरोना लासिकरणामध्ये उणिवा राहू नयेत म्हणूनच रंगीत तालीम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:49 PM2021-01-08T13:49:21+5:302021-01-08T13:51:59+5:30

Corona vaccine Kankavli Sindhudurgnews-प्रत्यक्षात कोरोना लसीकरण करताना कोणत्याही उणिवा राहू नयेत यासाठी लसीकरण रंगीत तालीम ( ट्राय रन ) घेण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिली

Color training so that there are no shortcomings in Corona Lasikarana! Kankavali Collector K. Information of Manjulakshmi | कोरोना लासिकरणामध्ये उणिवा राहू नयेत म्हणूनच रंगीत तालीम !

कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी कोरोना लस रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे कोरोना लासिकरणामध्ये उणिवा राहू नयेत म्हणूनच रंगीत तालीम कणकवलीत जिल्हाधिकारी के . मंजूलक्ष्मी यांची माहिती

कणकवली : प्रत्यक्षात कोरोना लसीकरण करताना कोणत्याही उणिवा राहू नयेत यासाठी लसीकरण रंगीत तालीम ( ट्राय रन ) घेण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिली.

कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी या लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली . यावेळी जिल्हाधिकारी के . मंजूलक्ष्मी यांनी भेट देत एकूण तयारीचा आढावा घेतला . तसेच नाव नोंदणी पासून लसीकरणानंतरपर्यंतच्या तयारीची पाहणी केली . तसेच काही सूचनाही केल्या.यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . हेमंत वसेकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . श्रीमंत चव्हाण , प्रांताधिकारी वैशाली राजमाने , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . महेश खलीपे , तहसीलदार आर . जे.पवार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय पोळ , डॉ . श्रीराम चौगुले , डॉ . सतीश टाक , डॉ . सी . एम . शिकलगार यांच्यासहित विविध विभागाचे खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते .

लसीकरणाच्या या ट्रायरन मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २५ जणांची रंगीत तालीम घेण्यात आली . त्यानंतर पुढील टप्प्यात प्रत्यक्ष लसीकरण सुरू होईल . त्यात आरोग्य , शासकीय, महसूल , जिल्हा परिषद कर्मचारी व नंतरच्या टप्प्यात ५० ते ६० वर्षावरील नागरिक व त्यानंतर सर्वसामान्यांसाठी लसीकरण करण्यात येणार आहे .

लसीकरणाबाबत काही शंका असल्यास टोल फ्री १०७७ व जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन विभागातील फोन नंबर यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले .
 

Web Title: Color training so that there are no shortcomings in Corona Lasikarana! Kankavali Collector K. Information of Manjulakshmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.