CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली तालुक्यातील साखळी काही तुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 03:17 PM2021-05-05T15:17:54+5:302021-05-05T15:20:13+5:30

CoronaVirus Kankavli Sindhudurg : गतवर्षीच्या लाटेत जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे कणकवली तालुक्यातीलच होते आणि आता दुसऱ्या लाटेतदेखील रुग्ण आढळण्याचे प्रमाण कणकवली तालुक्यातच जास्त आहे. त्यामुळे कणकवली तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कणकवली तालुक्यातील साखळी काही तुटेना.

: The chain in Kankavali taluka is not broken | CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली तालुक्यातील साखळी काही तुटेना

CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली तालुक्यातील साखळी काही तुटेना

Next
ठळक मुद्देकणकवली तालुक्यातील साखळी काही तुटेना कोरोनाने आणखी तिघांचा मृत्यू. ५३ रुग्ण आढळले

कणकवली : कणकवली तालुक्यात मंगळवारी नव्याने ५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर तिघांचा मृत्यू झाला आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण हा कणकवली तालुक्यातील खारेपाटण नडगिवे गावातूनच आढळला होता. त्यानंतर गतवर्षीच्या लाटेत जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे कणकवली तालुक्यातीलच होते आणि आता दुसऱ्या लाटेतदेखील रुग्ण आढळण्याचे प्रमाण कणकवली तालुक्यातच जास्त आहे. त्यामुळे कणकवली तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कणकवली तालुक्यातील साखळी काही तुटेना.

कणकवली तालुक्यात मंगळवारी सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कणकवली शहरातील ११, हळवल ४, कुंभवडे १, नाटळ १, हरकुळ बुद्रुक ३, घोणसरी १, फोंडा ११, कळसुली २, शिवडाव ३, ओटव ४, शिडवणे १, कसवण १, ओसरगाव २, जानवली २, भिरवंडे २, कलमठ ३, तर खारेपाटण येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये वारगाव येथील ७० वर्षीय पुरुष, हरकुळ येथील ६८ वर्षीय पुरुष, तर कलमठ येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, कणकवली तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असून, नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सध्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कणकवली तालुक्यात १ ते १० मे दरम्यान जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र, जनता कर्फ्यू संपला की, पुन्हा नागरिक बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी करतील. त्या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण राहणार नाही आणि पुन्हा रुग्णसंख्येला आवर घालणे कठीण बनणार आहे. त्यामुळे याबाबत नियोजन होणे गरजेचे आहे.

तालुक्यात कोरोनाचा विस्फोट सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण हा कणकवली तालुक्यातील खारेपाटण नडगिवे गावातूनच आढळला होता. त्यानंतर गतवर्षीच्या लाटेत जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे कणकवली तालुक्यातीलच होते आणि आता दुसऱ्या लाटेतदेखील रुग्ण आढळण्याचे प्रमाण कणकवली तालुक्यातच जास्त आहे. त्यामुळे कणकवली तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.

आरोग्य विभागाने तालुक्यात सर्व्हे करणे आवश्यक

कोरोनाचे रुग्ण हे कणकवली तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे हे रुग्ण आढळण्याची कारणे शोधण्यासाठी आरोग्य विभागाने काहीतरी स्वतंत्र यंत्रणा राबवून जास्त रुग्ण असलेल्या गावात सर्व्हे करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र टीमची निर्मिती करणे आवश्यक आहे.

Web Title: : The chain in Kankavali taluka is not broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.