काजू खरेदी दरात घट, शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:20 AM2020-03-18T11:20:56+5:302020-03-18T11:23:06+5:30

दोडामार्ग आठवडा बाजारात काजू खरेदी करण्यासाठी तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील व्यापारी हजेरी लावतात. मागील आठवड्यात रविवारी काजू खरेदी दर प्रति किलो १४० रुपये होता. मात्र, या रविवारी दरात घट होऊन प्रति किलो १३० रुपयेप्रमाणे काजू खरेदी केली जात होती. आठ दिवसांत प्रति किलोमागे दहा रुपयांची तफावत झाल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. अशाप्रकारे घट झाल्यास यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

Cashew price reduction, farmers in financial crisis: Ten rupees difference in eight days | काजू खरेदी दरात घट, शेतकरी आर्थिक संकटात

काजू खरेदीसाठी दोडामार्ग बाजारपेठेत व्यापारी आले होते.

Next
ठळक मुद्देकाजू खरेदी दरात घट, शेतकरी आर्थिक संकटात आठ दिवसांत दहा रुपयांची तफावत

दोडामार्ग : दोडामार्ग आठवडा बाजारात काजू खरेदी करण्यासाठी तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील व्यापारी हजेरी लावतात. मागील आठवड्यात रविवारी काजू खरेदी दर प्रति किलो १४० रुपये होता. मात्र, या रविवारी दरात घट होऊन प्रति किलो १३० रुपयेप्रमाणे काजू खरेदी केली जात होती. आठ दिवसांत प्रति किलोमागे दहा रुपयांची तफावत झाल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. अशाप्रकारे घट झाल्यास यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

गतवर्षी झालेल्या दुष्काळी पावसामुळे व वातावरणातील बदलांमुळे काजू पिकावर मोठा परिणाम झाला आहे. डिसेंबर महिन्यात काजूच्या झाडांना पालवी फुटण्याच्या काळात पावसाने जोर धरल्याने पालवी फुटण्यास विलंब झाला. त्यात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे काजूच्या झाडावर रोगराई पसरल्यामुळे किरकोळ आलेला मोहोरही गळून गेला.

शेतकऱ्याला काजू बागेतून वर्षाकाठी मिळणाऱ्या उत्पादनाच्या २० टक्के उत्पादन यावर्षी मिळणे कठीण झाले आहे. उत्पादन कमी झाले तर दर उंचावतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, परिस्थिती उलट असून, गतवर्षीच्या दरापेक्षा यंदाच्या दरात घट होत असल्याची चिन्हे दिसत आहेत.

दोडामार्गच्या रविवार आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मागील आठवड्यात प्रति किलो १४० रुपये दराने काजू खरेदी केला जात होता. मात्र, या रविवारी प्रति किलो १३० रुपयांनी काजू खरेदी करण्यात आला. आठ दिवसात प्रति किलोमागे दरात १० रुपयाने घट झाल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

शासनाने दर निश्चित करणे गरजेचे

जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील बहुतांशी लोक काजू पिकावर अवलंबून आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या चरितार्थ काजू पिकावर चालतो. मात्र, यावर्षी काजू पीक कमी प्रमाणात आहे. उत्पादन कमी झाले असून व्यापाऱ्यांनी काजू खरेदी दरही ताणून धरला आहे.

दिवसेंदिवस दरात घट होताना दिसत आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त आहे. शासनाने काजू दर निश्चित करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.
 

Web Title: Cashew price reduction, farmers in financial crisis: Ten rupees difference in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.