वायंगणीतून सी-वर्ल्ड प्रकल्प हलवणार, पर्यटनमंत्र्याची घोषणा, मात्र प्रकल्प सिंधुदुर्गातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 05:13 PM2019-01-25T17:13:40+5:302019-01-25T23:42:15+5:30

शेतकरी जर स्वेच्छेने जमीन देत असतील तरच आम्ही मालवण तालुक्यातील तोंडवली-वायंगणी येथे सी-वर्ल्ड प्रकल्प केला असता. पण शेतकऱ्यांची जबरदस्ती जमीन सरकार घेणार नाही. त्यामुळे सी-वर्ल्ड प्रकल्प तोंडवली-वायंगणीतून हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पर्यटन विभागाने घेतल्याची घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई येथे लोकमतशी बोलताना केली.

The C-World project will be shifted from Vyangani, the Minister of Tourism announced, but the project is in Sindhudurg | वायंगणीतून सी-वर्ल्ड प्रकल्प हलवणार, पर्यटनमंत्र्याची घोषणा, मात्र प्रकल्प सिंधुदुर्गातच

वायंगणीतून सी-वर्ल्ड प्रकल्प हलवणार, पर्यटनमंत्र्याची घोषणा, मात्र प्रकल्प सिंधुदुर्गातच

Next
ठळक मुद्देवायंगणीतून सी-वर्ल्ड प्रकल्प हलवणार, पर्यटनमंत्र्याची घोषणामात्र प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार लोकमतशी खास संवाद

अनंत जाधव

सावंतवाडी : शेतकरी जर स्वेच्छेने जमीन देत असतील तरच आम्ही मालवण तालुक्यातील तोंडवली-वायंगणी येथे सी-वर्ल्ड प्रकल्प केला असता. पण शेतकऱ्यांची जबरदस्ती जमीन सरकार घेणार नाही. त्यामुळे सी-वर्ल्ड प्रकल्प तोंडवली-वायंगणीतून हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पर्यटन विभागाने घेतल्याची घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई येथे लोकमतशी बोलताना केली.

सरकारकडे नव्या जागांचे प्रस्ताव आले आहेत. त्यावर अभ्यास सुरू असल्याचेही यावेळी मंत्री रावल म्हणाले. समुद्रातील विश्व पर्यटकांसाठी खुले होणार असून, हा आशिया खंडातील पहिला प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये राबविण्यात येणार आहे, असे यावेळी मंत्री रावल म्हणाले. सिंधुदुर्गातील प्रकल्पाबाबत पर्यटन मंत्री जयकुमार रावल व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यात मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी विविध विषयावर चर्चा झाली.

यावेळी मंत्री जयकुमार रावल म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा आम्हाला पर्यटनातील मॉडेल बनवायचे आहे. त्यामुळे राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. १९९५ मध्ये सिंधुदुर्गमध्ये तीन पंचतारांकित हॉटेल प्रकल्प आले होते. त्यातील एका पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प हा पूर्ण झाला आहे. तर ताज या पंचतारांकित हॉटेलच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तर तिसरे हॉटेल हे पर्यटन विभागाने उभे केले आहे. ही तीनही हॉटेल पूर्ण होतील तेव्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्गमध्ये येतील, असे यावेळी मंत्री रावल यांनी सांगितले.

सी-वर्ल्ड प्रकल्प तोंडवली-वायंगणी येथे करण्यासाठी शासन आग्रही होते. पण तेथील शेतकरी जमिनी देण्यास इच्छुक नाहीत. शेतकरी जर स्वेच्छेने जमिनी देण्यास तयार नसतील तर आम्ही जमिनी हिसकावून घेऊन प्रकल्प करणार नाही. त्यामुळे सी-वर्ल्ड प्रकल्प या जागेवरून हलवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे यावेळी मंत्री रावल यांनी जाहीर केले आहे.

नवीन जागा अद्याप निश्चित झाली नाही. सरकारकडे तीन ते चार प्रस्ताव आले आहेत. त्यावर विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी शंभर कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. पण हा निधी आम्ही शासनाला परत दिला आहे. जेव्हा आम्हाला गरज लागेल तेव्हा शासन तो निधी देईल, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आशिया खंडातील पहिला प्रकल्प अंडर ग्राऊंड ग्लास समरीचा म्हणजेच पाण्यातील विश्व हे पर्यटकांना बघता येणार आहे. त्यासाठी चांदा ते बांदा योजनेतून निधीची तरतूद करण्यात आली आहे. पण हा प्रकल्प कुठे करायचा हे निश्चित झाले नाही. मात्र या प्रकल्पामुळे अधिकाधिक पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील असा आम्हाला विश्वास आहे, असेही यावेळी मंत्री रावल यांनी सांगितले.

स्थानिक रोजगाराच्या दृष्टीने नवे धोरण

पर्यटन विभाग स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी एक नवीन धोरण आणणार असून, यात स्थानिकांना कॉटेजीस बांधून दिले जाणार आहेत. यात पर्यटक राहतील. ही कॉटेजीस घराच्या समोर बांधून दिली जाणार आहेत. यासाठी जागतिक कंपनीशी चर्चा सुरू असल्याचेही यावेळी पर्यटनमंत्री रावल यांनी सांगितले.

Web Title: The C-World project will be shifted from Vyangani, the Minister of Tourism announced, but the project is in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.