कावळेसाद खोऱ्यात राबविणार जैवविविधता संशोधन मोहीम, तज्ज्ञांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 05:20 PM2020-12-04T17:20:51+5:302020-12-04T17:25:34+5:30

AmboliHillStation, tourism, sindhudurg सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहसी क्रीडा पर्यटनाचा अभिनव अध्याय सुरू करणारी कावळेसाद रॅपलिंग आणि कावळेसाद खोऱ्यातील जैववैविधता संशोधन पदभ्रमंती ही साहसी मोहीम डिसेंबरच्या २६ व २७ तारीखला आयोजित केली असल्याची घोषणा सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध गिर्यारोहक रामेश्वर सावंत यांनी केली.

Biodiversity research expedition to be carried out in Kavalesad valley | कावळेसाद खोऱ्यात राबविणार जैवविविधता संशोधन मोहीम, तज्ज्ञांचा सहभाग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहसी क्रीडा पर्यटनाचा अभिनव अध्याय सुरू करणारी कावळेसाद रॅपलिंग आणि कावळेसाद खोऱ्यातील जैववैविधता संशोधन पदभ्रमंती ही साहसी मोहीम डिसेंबरच्या २६ व २७ तारीखला आयोजित केली असल्याची घोषणा सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध गिर्यारोहक रामेश्वर सावंत यांनी केली.

Next
ठळक मुद्देकावळेसाद खोऱ्यात राबविणार जैवविविधता संशोधन मोहीम, तज्ज्ञांचा सहभाग सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबतर्फे २६, २७ डिसेंबरला आयोजन

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहसी क्रीडा पर्यटनाचा अभिनव अध्याय सुरू करणारी कावळेसाद रॅपलिंग आणि कावळेसाद खोऱ्यातील जैववैविधता संशोधन पदभ्रमंती ही साहसी मोहीम डिसेंबरच्या २६ व २७ तारीखला आयोजित केली असल्याची घोषणा सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध गिर्यारोहक रामेश्वर सावंत यांनी केली.

याबाबत माहिती देताना सावंत म्हणाले की, आंबोली या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी ह्यकावळेसादह्ण हा पर्यटकांना सदैव मोहविणारा सह्याद्रीचा कातळकडा परिसर आहे. पावसाळ्यात या सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारे जलप्रपात-पाणी त्या विलोभनीय खोऱ्यातून पार शिरशिंगे गावात पोहोचते.

या खोऱ्यात बहुमूल्य जैववैविधता आहे. अशा या खोऱ्यात कावळेसाद कड्यावरून पहिले अंदाजे २५० फूट खोल दरीत रॅपलिंग करीत सदस्य खाली उतरतील. तिथून थोडी उतारचाल झाल्यावर पुन्हा थोडे रॅपलिंग करतील आणि या अजस्त्र खोऱ्यात पोहोचतील.

हा पहिला टप्पा पार पडल्यानंतर खोऱ्यातून इथल्या पशुपक्षी-पाखरे, दुर्मीळ वनस्पती, कीटक, दगड यांचे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण करीत खोऱ्यातून पदभ्रमंतीचा अविस्मरणीय साहस-आनंद अनुभवतील. दुर्मीळ क्षण कॅमेरात टिपतील, नोंदी घेतील. रात्रीचा मुक्काम अर्थातच निबिड जंगलात कॅम्पसाईट तयार करून केला जाईल. रात्री सामूहिक जेवण बनविणे, अनुभव कथन, मार्गदर्शन असा कार्यक्रम होईल.

या मोहिमेसाठी रॅपलिंगच्या पूर्वानुभवाची आवश्यकता नाही. मात्र दाट जंगल भागात, डोंगरदऱ्यांतून आपले साहित्य घेऊन चालण्याइतकी शारीरिक क्षमता असावी. सहभागी सदस्यांची सर्वतोपरी काळजी आणि वनविभागाच्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.

पदभ्रमंती मार्गात सापडून येणारा प्लास्टिक तत्सम कचरा जमा करून तो आणला जाणार आहे. या मोहिमेत जैवविविधता व वनस्पती तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे, पक्षी तज्ज्ञ डॉ. योगेश कोळी मार्गदर्शन करणार आहेत. मोहिमेच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Biodiversity research expedition to be carried out in Kavalesad valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.