लोककलाकाराना कला सादर करण्याची परवानगी द्या, प्रांताधिकाऱ्याना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 05:32 PM2021-07-29T17:32:33+5:302021-07-30T13:31:17+5:30

CoronaVirus Kankavli Sindhudurg : कोरोनाच्या पहिल्या लाटे प्रमाणे दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लोककलाकारांना बसला आहे. कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळख असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आहे. याकाळात लोककलाकारांना शासनाच्या नियामानुसार कला सादर करण्याची परवानगी मिळावी , अशी मागणी कणकवली भजन संस्था अध्यक्ष, भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडी कोकण संघटक तथा कणकवली पंचायत समिती उपसभापती प्रकाश पारकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.

Allow folk artists to present art, statement to prefect | लोककलाकाराना कला सादर करण्याची परवानगी द्या, प्रांताधिकाऱ्याना निवेदन

लोककलाकाराना कला सादर करण्याची परवानगी द्या, प्रांताधिकाऱ्याना निवेदन

googlenewsNext
ठळक मुद्देलोककलाकाराना कला सादर करण्याची परवानगी द्या कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन

कणकवली : कोरोनाच्या पहिल्या लाटे प्रमाणे दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लोककलाकारांना बसला आहे. कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळख असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आहे. याकाळात लोककलाकारांना शासनाच्या नियामानुसार कला सादर करण्याची परवानगी मिळावी , अशी मागणी कणकवली भजन संस्था अध्यक्ष, भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडी कोकण संघटक तथा कणकवली पंचायत समिती उपसभापती प्रकाश पारकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.

त्यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोकणातील लोककलाकारांवर कोविड - १९ प्रादुर्भाव कालावधीमध्ये उपासमारीची वेळ आली आहे. त्यात शासनाने कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही. त्यामध्ये भजन , कीर्तनकार , दशावतार , मृदुंगमणी , गोंधळी , शक्ती तुरा , नमन यासारखे सर्वच लोककलाकारांचे कार्यक्रम बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी.

तसेच पुढील काळात येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या दरम्यान कार्यक्रमासाठी आम्हाला परवानगी मिळावी. शासनाने याचा गांभीर्याने विचार न केल्यास संपूर्ण कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रात आपण जनआंदोलन उभारण्यात येईल. १५ ऑगस्ट पर्यंत शासनाकडून याबाबत निर्णय झाला नाही तर रस्त्यावर उतरून भव्य आंदोलन छेडण्यात येईल , असा इशाराही या निवेदनात दिला आहे. दरम्यान , हे निवेदन देताना प्रकाश पारकर यांच्या सोबत भजनी बुवा संतोष मिराशी , दशावतारी कलाकार आप्पा दळवी, सुरेश गुरव , श्याम तांबे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Allow folk artists to present art, statement to prefect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.