Administration keeps a close eye on temples and tourist spots in Sindhudurg: Collector | सिंधुदुर्गातील देवस्थान, पर्यटनस्थळावर प्रशासनाची करडी नजर :जिल्हाधिकारी 

सिंधुदुर्गातील देवस्थान, पर्यटनस्थळावर प्रशासनाची करडी नजर :जिल्हाधिकारी 

ठळक मुद्देसिंधुदुर्गातील देवस्थान, पर्यटनस्थळावर प्रशासनाची करडी नजर :जिल्हाधिकारी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कसून तपासणी केली जाणार

सिंधुदुर्ग : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगल कार्यालये,धार्मिक कार्यक्रमासह देवस्थान व पर्यटन स्थळावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. संदेश कांबळे उपस्थित होते.

 सर्वानी नियम पाळा, जिल्हा लॉकडाऊनमध्ये जायची पाळी आणू नका असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले असून ५० पेक्षा कमी व्यक्तीचा सहभाग, मास्क, सॅनिटायझर सुविधांचा वापर होतो की नाही याची कसून तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी  दिली.

Web Title: Administration keeps a close eye on temples and tourist spots in Sindhudurg: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.