Action on a drunk car | दारू वाहतूक करणाऱ्या कारवर कारवाई
दारू वाहतूक करणाऱ्या कारवर कारवाई

ठळक मुद्देदारू वाहतूक करणाऱ्या कारवर कारवाईदोघांना कोठडी : ५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

मालवण : पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारुची अवैधरित्या वाहतूक करणाºया दोघांना चारचाकी गाडीसह ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यात दारू व कार असा ५ लाख ४१ हजार ९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मंगळवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, मंगेश माने, राजन पाटील, प्रसाद आचरेकर, विश्वास पाटील यांच्या पथकाने कुंभारमाठ वेंगुर्लाकडे जाणाऱ्या सागरी महामार्गावर मराई मंदिरासमोर नाकाबंदी केली असता चारचाकी गाडी (एम. एच. ०३, बीएस-३१८९)मधून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

त्यानुसार गाडीतील संतोष पांडुरंग देऊलकर (२८, रा. बिबवणे कुडाळ), लक्ष्मीप्रसाद मांजरेकर (३५, रा. गाडीअड्डा वेंगुर्ला) या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून गोवा बनावटीच्या दारुचे ६३ हजार ४९२ रुपये किमतीचे ३९ बॉक्स व चारचाकी गाडी असा ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही संशयित आरोपींना मालवण न्यायालयात हजर केले असता २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील करीत आहेत.

Web Title: Action on a drunk car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.