जानवली रतांबे व्हाळ येथे दोन ट्रकमध्ये अपघात; ९ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:40 PM2020-11-09T12:40:09+5:302020-11-09T12:42:58+5:30

accident, highway, kankavli, hospital, sindhudurg मुंबई - गोवा महामार्गावर कणकवली पासून जवळच असलेल्या जानवली रतांबे व्हाळ येथे कुडाळ ते कोल्हापूर जाणाऱ्या ट्रकला समोरुन येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही अपघातग्रस्त ट्रक मधून प्रवास करणारे चालकासह ९ कामगार जखमी झाले आहेत . या जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . ही घटना सोमवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

Accident in two trucks at Janwali Ratambe Vhal! | जानवली रतांबे व्हाळ येथे दोन ट्रकमध्ये अपघात; ९ जण जखमी

जानवली रतांबे व्हाळ येथे दोन ट्रकमध्ये अपघात; ९ जण जखमी

Next
ठळक मुद्देजानवली रतांबे व्हाळ येथे दोन ट्रकमध्ये अपघात !९ जण जखमी ; कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार

कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावरकणकवली पासून जवळच असलेल्या जानवली रतांबे व्हाळ येथे कुडाळ ते कोल्हापूर जाणाऱ्या ट्रकला समोरुन येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही अपघातग्रस्त ट्रक मधून प्रवास करणारे चालकासह ९ कामगार जखमी झाले आहेत . या जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . ही घटना सोमवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातात दोघेजण गंभीर जखमी असल्याने त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले . तर इतरांवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .जखमींमध्ये विनायक कृष्णात चौगुले ( ३८ ) , शिवाजी पाटील ( २८ ) , जयराम बामाजी लांबोरे ( ४१ ) , चिरंजीव उत्तम पाटील ( २६ ) , सुशांत डोंगले ( २३ ) , रंगराव कस्तुरे ( ३८ ) , मिलींद पाटील ( २४ ) , सचिन बारड ( २७ ) , विवेकानंद चौगुले ( २ ९ ) यांचा समावेश आहे .

या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली . त्यानंतर जखमी रुग्णांचा जाबजबाब नोंदविण्यात आला . अधिक तपास पोलीस हवालदार उत्तम वंजारे करत आहेत .

Web Title: Accident in two trucks at Janwali Ratambe Vhal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.