सावंतवाडीत अपघात; पती-पत्नी जखमी, कारची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:25 AM2019-08-20T11:25:20+5:302019-08-20T11:26:34+5:30

सावंतवाडी-कोलगाव मार्गावर हॉटेल सागर पंजाबसमोर रविवारी दुपारी तीनच्या सुमारास डंपरला ओव्हरटेक करताना कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात कोलगाव येथील रवींद्र नारायण जाधव व पूनम रवींद्र जाधव हे दाम्पत्य जखमी झाले. उपचारासाठी त्यांना सावंतवाडीतील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Accident in Sawantwadi; Husband and wife injured | सावंतवाडीत अपघात; पती-पत्नी जखमी, कारची दुचाकीला धडक

सावंतवाडीत अपघात; पती-पत्नी जखमी, कारची दुचाकीला धडक

Next
ठळक मुद्देसावंतवाडीत अपघात; पती-पत्नी जखमीडंपरला ओव्हरटेक करताना कारची दुचाकीला जोरदार धडक

सावंतवाडी : सावंतवाडी-कोलगाव मार्गावर हॉटेल सागर पंजाबसमोर रविवारी दुपारी तीनच्या सुमारास डंपरला ओव्हरटेक करताना कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात कोलगाव येथील रवींद्र नारायण जाधव व पूनम रवींद्र जाधव हे दाम्पत्य जखमी झाले. उपचारासाठी त्यांना सावंतवाडीतील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रवींद्र जाधव हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन कोलगावमधून सावंतवाडी येथे येत होते. तर कार सावंतवाडीहून कोलगावच्या दिशेने जात होती. दरम्यान, कोलगाव मार्गावरील सागर पंजाब हॉटेलसमोर डंपरला ओव्हरटेक करण्याच्या नादात कारची दुचाकीला जोरदार धडक बसली.
यात दुचाकीस्वार रवींद्र जाधव व त्यांची पत्नी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रवींद्र यांच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिसांत झाली नव्हती. पोलिसांनी घटनास्थळांचा पंचनामा केला.

Web Title: Accident in Sawantwadi; Husband and wife injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.