दळवी महाविद्यालयाचे प्राविण्य, मुंबई येथे पार पडला ५२ वा युवा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:37 PM2019-10-01T12:37:46+5:302019-10-01T12:39:39+5:30

मुंबई येथे पार पडलेल्या ५२ व्या युवा महोत्सवात तळेरे येथील दळवी महाविद्यालयाने यश संपादन करून प्राविण्य मिळविले. जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केल्यानंतर या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी विशेष अभिनंदन केले.

 The 8th Youth Festival was held at Dalvi College of Proficiency, Mumbai | दळवी महाविद्यालयाचे प्राविण्य, मुंबई येथे पार पडला ५२ वा युवा महोत्सव

मुंबई येथे पार पडलेल्या ५२ व्या युवा महोत्सवात तळेरे येथील दळवी महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांशी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी अभिनंदन केले. यावेळी कॅप्टन निलिमा प्रभू उपस्थित होत्या.

googlenewsNext
ठळक मुद्दे दळवी महाविद्यालयाचे प्राविण्य, मुंबई येथे पार पडला ५२ वा युवा महोत्सवविविध स्पर्धांमध्ये सिंधुदुर्गचे केले प्रतिनिधित्व

दोडामार्ग : मुंबई येथे पार पडलेल्या ५२ व्या युवा महोत्सवात तळेरे येथील दळवी महाविद्यालयाने यश संपादन करून प्राविण्य मिळविले. जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केल्यानंतर या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी विशेष अभिनंदन केले.

आॅगस्ट महिन्यात कणकवली येथे जिल्हास्तरीय महोत्सव पार पडला होता. त्यामध्ये अक्षय मेस्त्री, अंकिता कोकरे, सायली पालव, अनिकेत तर्फे आणि प्रतीक वरुणकर या विजेत्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात अली होती. याअंतर्गत विद्यापीठस्तरीय युवा महोत्सवात पेंटिंग, डीबेट, क्ले मॉडेलिंग, पोस्टर मेकिंग, कथाकथन अशा विविध कलाप्रकारात महाविद्यालयाने आपला सहभाग नोंदवला होता.

युवा महोत्सवामध्ये अंतिम फेरीसाठी सुमारे २९६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम वर्ष बीएमएमचा विद्यार्थी अक्षय मेस्त्री याने क्ले मॉडेलिंगमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. क्ले मॉडेलिंग स्पर्धेमध्ये एकूण २८ विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्रा. विनायक दळवी यांचे विद्यार्थी व ३ वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते राजेश केणी यांचे क्ले मॉडेलिंगसाठी विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख सहा. प्रा. सूरज लिंगायत यांचे मार्गदर्शन व सहा. प्रा. सुप्रिया जाधव यांचे सहकार्य लाभले.

कुलगुरूंची विद्यार्थ्यांशी हितगुज

दळवी महाविद्यालयाच्या भूदात्या कॅप्टन निलिमा प्रभू यांनी स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याशी भेट घडवून आणली. दळवी महाविद्यालयाला कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर हे अनेकदा महाविद्यालयाला भेट देतात. कुलगुरू हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपूत्र असल्याने त्यांचे नेहमी दळवी महाविद्यालयातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रेम मिळते. तसेच ते शिक्षक व विद्यार्थ्यांच्या थेट संपर्कात राहून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात.

 

Web Title:  The 8th Youth Festival was held at Dalvi College of Proficiency, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.