वृक्ष लागवडीचे १ कोटी ५१ लाखाचे अनुदान प्राप्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 03:10 PM2020-09-24T15:10:32+5:302020-09-24T15:12:28+5:30

कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत तोडलेल्या झाडांच्या बदल्यात शासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून १ किमी परिसरात वृक्ष ...

1 crore 51 lakh grant for tree planting received! | वृक्ष लागवडीचे १ कोटी ५१ लाखाचे अनुदान प्राप्त !

वृक्ष लागवडीचे १ कोटी ५१ लाखाचे अनुदान प्राप्त !

Next
ठळक मुद्देमहामार्गालगत शेतकऱ्यांनी खाजगी क्षेत्रात केली लागवड वैभव नाईक यांची माहिती

कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत तोडलेल्या झाडांच्या बदल्यात शासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून १ किमी परिसरात वृक्ष लागवड करण्याची योजना अंमलात आणली. त्याअंतर्गत सिंधुदुर्गातील १७० शेतकऱ्यांनी खाजगी क्षेत्रात ५२,६३१ वृक्ष लागवडीची कामे केली असून त्यासाठीचे १ कोटी ५१ लाख २६ हजार ८८५ रुपयांचे रोपवनपूर्व प्रथम वर्ष अनुदान सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०१९ मध्ये या झाडांची लागवड करण्यात आली होती. परंतु त्याचे अनुदान अद्याप पर्यंत मिळाले नव्हते. यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत तसेच आपण राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार पाठपुरावा सूरु ठेवला होता. त्या पाठपुरवठ्याला यश आले असून शेतकऱ्यांनी लावलेल्या वृक्ष लागवडीचे अनुदान सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.

कणकवली ते झाराप पर्यंत १७० शेतकऱ्यांनी शासनाच्या योजने अंतर्गत १ कि मी पर्यंतच्या आपल्या खाजगी क्षेत्रात ५२,६३१ वृक्षांची लागवड केली होती. त्यासाठी प्रथम वर्षासाठी १ कोटी ५१ लाख २६ हजार ८८५ रुपयांचे अनुदान देणे अनिवार्य होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत हे अनुदान सामाजिक वनीकरण विभागात वर्ग झाले नव्हते.

त्यामुळे संबधित लाभार्थी शेतकरी लोकप्रतिनिधींकडे हे अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी मागणी करत होते. यामुळे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आपण राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठपुरावा केला. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांचे १ कोटी ५१ लाख २६ हजार ८८५ रुपयांचे अनुदान मंजूर करून घेतले आहे. हे अनुदान सामाजिक वनीकरण विभागाकडून लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप केले जाईल . असेही आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
 

Web Title: 1 crore 51 lakh grant for tree planting received!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.