राष्ट्रीय: भारतात मोठा दहशतवादी कट उधळला; गुजरातमध्ये तिघांना अटक
गुजरात एटीएसने शस्त्र पुरवठा करणाऱ्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करून भारतातील हल्ल्याचा कट उधळला आहे. हे संशयित एक वर्षांपासून रडारवर होते. हे ३ संशयित दहशतवाद्यांच्या नव्या मॉड्यूलशी जोडले होते. गुजरातमध्ये अडालज येथे या तिघांना अटक करण्यात आली. हे तिघेही ISIS साठी काम करत होते. अलीकडेच उत्तर प्रदेश एटीएसने सहारनपूर येथून दहशतवादी बिलालला अटक केली होती.
महाराष्ट्र: शिंदे, ठाकरेंना धक्का; दोन मोठे नेते भाजपात पक्षप्रवेश करणार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी भाजपाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना धक्का दिला. कल्याण डोंबिवलीतील उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे भाजपात प्रवेश करणार, तर काँग्रेसचे संतोष केणेदेखील भाजपात येत आहेत. दुसरीकडे सोलापुरात माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत भाजपात प्रवेश करणार असल्याने एकनाथ शिंदे गटाला फटका बसणार आहे.
बीड: झोपडीतील पहिलवानाची सुवर्ण कामगिरी; बीडच्या सनी फुलमाळीचा आशियाई स्पर्धेत दबदबा!
बेहद गरीब परिस्थितीत वाढलेल्या बीडच्या सनी फुलमाळीने आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबाच्या पाठिंब्याने आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून त्याने ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा दिली.
राष्ट्रीय: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; शिक्षकांच्या नियुक्तीचे कोर्टाचे आदेश
ज्या शिक्षकांनी आरटीई अॅक्ट अर्थात मुलांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा-२००९ अंतर्गत वाढवलेल्या मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण केली आहे; त्यांना केवळ मूळ नियुक्तीच्या वेळी टीईटी प्रमाणपत्र नव्हते या कारणास्तव सेवेतून काढून टाकता येणार नाही, असा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
बीड: गेवराईत वाळू माफियांना मदत करताना पोलीस हवालदार लाच घेताना रंगेहाथ अटकेत
गेवराई येथे वाळू वाहतूक प्रकरणात आरोपीला मदत करण्यासाठी एका पोलीस हवालदाराला 20 हजार रुपयांची लाच घेताना अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली, नवीन निरीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच पोलीस दलातील भ्रष्टाचार उघडकीस आणला.
बीड: नार्को टेस्टसाठी मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला. त्यावर धनंजय मुंडे म्हणाले की, थोतांड करू नका, माझी आणि जरांगेंची नार्को टेस्ट करा. मुंडेंच्या या मागणीनंतर मनोज जरांगेंनी थेट पोलीस अधीक्षकांना नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज दिला आहे.
हिंगोली: हिंगोली-नांदेड महामार्गावर आगीचा थरार! १२० फ्रीज असलेला कंटेनर जळून खाक.
हिंगोली-नांदेड महामार्गावर वारंगा फाट्याजवळ १२० फ्रीज घेऊन जाणाऱ्या कंटेनरला आग. चालकाने सुखरूप बचाव केला, आगीने रौद्ररूप धारण केले, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. ट्रकने पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर: उद्धव ठाकरे खरे दगाबाज; संजय शिरसाटांची टीका
संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. युतीत लढून काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्याने ते दगाबाज आहेत, असे शिरसाट म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. निवडणुकीत कार्यकर्ते स्वतंत्र निवडणूक लढवायचं म्हणत आहे. यामुळे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. तसेच जरांगे-मुंडे यांच्या नार्को टेस्टची मागणी केली.
छत्रपती संभाजीनगर: आठ हजारांची लाच घेताना अभियंता जाळ्यात; एसीबीची पंचायत समितीत कारवाई.
शेतकऱ्याचे बिल मंजूर करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये अभियंत्यास ८ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी दिली. आरोपीच्या घरी झडती सुरू.
छत्रपती संभाजीनगर: पाणीपुरवठा योजनेत अडथळा आणल्यास गुन्हे दाखल: न्यायालयाचा इशारा
औरंगाबाद पाणीपुरवठा प्रकल्पात अडथळे. अडथळे निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश. निधी मिळाल्याने कंत्राटदाराला गती देण्याची विनंती. कामात दिरंगाई; निधीअभावी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन अंतिम मुदत.
राष्ट्रीय: EVM स्टाँग रूमचे सीसीटीव्ही मध्यरात्री बंद; RJD पोस्ट केला व्हिडिओ
बिहारमधील ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बंद आणि एका पिकअप वाहनाच्या एन्ट्रीवरून आरजेडीने मोठा दावा केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर जिल्हा प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला. त्यात निष्काळजीपणा आढळल्यास कारवाईचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. हाजीपूर येथे स्टाँगरूममधील सीसीटीव्ही पाळीपाळीने बंद केले जात आहेत. मध्य रात्री याठिकाणी पिक अप व्हॅन आत जाते आणि बाहेर येते असा दावा आरजेडीने केला आहे.
महाराष्ट्र: आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची -राधाकृष्ण विखे पाटील
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे", असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांनाच सुनावले. काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सारखं फुकट, सारखी माफी असे कसे चालेल, असे विधान केले होते.
जालना: शेतकऱ्यांनो, 'दगाबाज' सरकारचा 'पंचनामा' करा, कर्जमाफी मिळेपर्यंत मतबंदी करा: ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कर्जमाफी मिळेपर्यंत 'मतबंदी' करण्याचे आवाहन केले. सरकारने पोकळ आश्वासने देत केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास दिला, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरही त्यांनी टीका केली.
पुणे: ‘त्या’ जमीन घोटाळ्याची जूनमध्येच केली होती तक्रार
कर्वेनगर येथील छावा कामगार युनियन अध्यक्ष दिनकर कोतकर यांनी ४ जून रोजी सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडे या व्यवहारात मुद्रांक शुल्क न भरताच हा व्यवहार केला गेल्याची तक्रार केली व या खरेदीखतामुळे शासनाचे ७ टक्के याप्रमाणे सुमारे २१ कोटी रुपये नुकसान झाले असल्याची ती तक्रार होती. पण याबाबत कोतकर यांच्याशी महसूल प्रशासन किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही.
परभणी: रस्त्यासाठी गाव विक्रीला; ग्रामस्थांचा गांधीगिरीचा मार्ग
रस्त्याच्या कामाच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने त्रस्त झालेल्या परभणी जिल्ह्यातील टाकळवाडी ग्रामस्थांनी अख्खे गाव विक्रीला काढले. सततच्या आंदोलनानंतरही उपयोग न झाल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विक्रीचे बॅनर लावण्यात आले.
राष्ट्रीय: भारतात हल्ल्याचा कट: बिलालच्या चौकशीतून पाकिस्तानी कनेक्शन उघड
उत्तर प्रदेश एटीएसने दहशतवादी बिलालला अटक केली, त्याच्या चौकशीतून पाकिस्तानी संबंध उघड झाले आहे. भारतात हल्ला करण्याची तयारी असल्याचेही समोर आले आहे. बिलाल अल-कायदा हँडलर्ससह ४ हजार नंबरच्या संपर्कात होता, तो हल्ल्यांची योजना आखत होता आणि जिहादचा प्रचार करत होता. त्याने सोशल मीडियावरून दहशतवाद्यांचे उदात्तीकरण केले आणि भारतात हिंसक जिहादसाठी सोशल मीडियाद्वारे तरुणांची भरती केली.
बीड: शेतकऱ्यांचे नशीब बदलणार केंद्र-राज्य सरकार: कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार मदतीसाठी तत्पर; कृषी मंत्री चौहान यांचे आश्वासन. शेतकऱ्यांनी फळे, फुले व सेंद्रिय शेतीकडे वळावे.बियाणे अनुदान थेट खात्यात जमा होणार. ग्लोबल विकास ट्रस्टचे प्रयोग देशभरात राबवणार, असे चौहान म्हणाले.
पुणे: व्यवहार रद्द करण्यासाठी लागणार तब्बल ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क
मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचे जमीन खरेदीचे दोन कारनामे उघड झाल्यानंतर अजित पवार यांच्यावर चौफेर टीका झाली. यानंतर बॅकफुटवर गेलेल्या अजित पवार यांनी मुंढवा येथील जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले. मात्र, कायदेशीरदृष्ट्या खरेदीखत रद्द करण्यासाठी दोन्ही पक्षकारांना ४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी सोमवारनंतर कार्यवाही करावी लागेल, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कल्याण डोंबिवली: पाणी टंचाईमुळे त्रस्त दिव्यांग वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न, सुदैवाने बचावला
डोंबिवलीत पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या एका ७६ वर्षीय दिव्यांग व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळीच हस्तक्षेप केल्याने ते बचावले. नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, प्रशासनाकडून तातडीने कार्यवाहीची मागणी होत आहे.
पुणे: निलंबित तहसीलदाराने केला अधिकाराचा गैरवापर, मुंढव्यातील जमीन मोकळी करण्याचे दिले होते आदेश
पुणे : मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात केवळ दुय्यम निबंधकच दोषी नसून खरेदीखत झाल्यानंतर त्या जागेचा ताबा तातडीने द्यावा, असे आदेश निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी भारतीय वनस्पतीशास्त्र विभागाला दिले होते. खरेदीखताचा फेरफार मालमत्ता पत्रकावर झालेला नसतानाही बड्या धेंडांना मदत करण्यासाठी येवले यांनी अधिकाराचा गैरवापर करत ही जमीन परस्पर मोकळी करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला दिलेल्या अहवालातून तहसीलदारांनी या प्रकरणात हा उद्योग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
फिल्मी: अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा साखरपुडा; होणारा नवरा कोण?
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणजे जयवंत वाडकर. वाडकर कुटुंबाच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी वाडकरचा साखरपुडा झाला आहे. स्वामिनीचा थाटामाटात साखरपुडा झाला. स्वामिनीच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. स्वामिनीच्या साखरपुड्याला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. कोण आहे स्वामिनीचा नवरा? जाणून घ्या
क्रिकेट: भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज टी२० मालिका विजयाची संधी!
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिका जिंकण्याची संधी आहे. गिल आणि सूर्यकुमार यांच्या फलंदाजीतील सुधारणेवर लक्ष केंद्रित आहे. भारताचा ऑस्ट्रेलियामध्ये १७ वर्षांपासून टी२० मालिका न हरण्याचा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. या सामन्यात फिरकीपटूंची कामगिरी निर्णायक ठरेल.
मुंबई: ठाणे-बोरीवली टनेल: घरे जमीनदोस्त, प्रकल्पाला वेग, मागाठाणेत झोपड्या हटवल्या
एमएमआरडीएने ठाणे-बोरीवली बोगद्याच्या कामाला गती दिली आहे. मागाठाणे येथील घरे तोडण्यात आली आहेत. १५७ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. एका आठवड्यात जागा रिकामी होणार आहे. बाधित रहिवाशांचे पुनर्वसन सुरू आहे.
मुंबई: एशियाटिक सोसायटीची निवडणूक सदस्य वादामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित
एशियाटिक सोसायटीची शनिवारी होणारी निवडणूक सदस्य यादीतील वादामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. व्यवस्थापन समितीनुसार, एक स्वतंत्र लेखा परीक्षक मतदार यादीची पडताळणी करेल आणि नवीन निवडणुकीची तारीख निश्चित करण्यापूर्वी ती उमेदवारांना दिली जाईल.
ठाणे: पालघरचे मच्छीमार नामदेव मेहेर पाकिस्तानात ताब्यात, सीमेचे उल्लंघन
पालघरचे मच्छीमार नामदेव मेहेर अनवधानाने पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याने तेथे पकडले गेले. या घटनेने जुन्या जखमा उघडकीस आणल्या आहेत, कारण यापूर्वी मेहेर यांच्या जावयाचाही अशाच घटनेत मृत्यू झाला होता. आता मेहेर यांच्या सुटकेसाठी कुटुंबीयांनी शासनाकडे मदतीची याचना केली आहे.
महाराष्ट्र: प्रभाग रचनेच्या निकालांच्या अधीन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: उच्च न्यायालय
प्रभाग रचना व आरक्षणासंदर्भातील याचिकांच्या निकालावर निवडणुका अवलंबून आहेत. उच्च न्यायालयाने राज्य सरकार व निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. अंतिम सुनावणी २७ नोव्हेंबरला होईल. याचिकाकर्त्यांनी प्रभाग रचनांना आव्हान देत आयोगाच्या पूर्वीच्या निर्णयानुसार निवडणुका घेण्याची मागणी केली होती.
आंतरराष्ट्रीय: मोदी माझे मित्र; पुढील वर्षी मी भारतात येण्याची शक्यता- ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील वर्षी भारतभेटीचे संकेत दिले. पंतप्रधान मोदींना महान व्यक्ती आणि मित्र असा उल्लेख केला. ते दोघे मिळून भेटीबाबत निर्णय घेतील, असे म्हणत उत्तम अनुभव घेण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. भारत पुढील वर्षी क्वाड शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. त्यासाठी येणार असल्याचे ट्रम्प म्हणाले.
महाराष्ट्र: जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा दोन आठवड्यात; ३० दिवसात निवडणुका
राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा लवकरच होईल. निवडणुका ३० दिवसांत होण्याची शक्यता आहे. प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुका २० जानेवारीपूर्वी अपेक्षित आहेत.
बीड: ॲट्रॉसिटीचा फिर्यादी विनयभंग प्रकरणी आरोपी, केजमधील खळबळजनक घटना
एका अल्पवयीन मुलीने तरुणावर विनयभंगाचा आरोप केला, कारण त्याने तिला प्रेम व्यक्त केले. यापूर्वी नातेवाईकांनी त्याला मारहाण केली, ज्यामुळे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. दोघेही १७ वर्षांचे आहेत; पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे या दुहेरी गुन्ह्याचा आणि या नाट्यमय घडामोडींचा पुढील तपास करत आहेत.
पुणे: पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
"मी आधीच सांगितलं आहे की, मला या व्यवहाराबद्दल माहिती नव्हतं. याची चर्चा सुरू झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना कॉल केला होता. त्यांना सांगितलं की, तुम्ही राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला चौकशी करायची असेल, समिती नेमायची असेल; त्या सगळ्या गोष्टींना माझा पाठिंबा आहे", असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.