कमजोरी दूर करून 'हे' ५ सुपर फूड्स भरतील तुमच्या लैंगिक जीवनात नवा जोश, नवा उत्साह!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 03:43 PM2019-06-01T15:43:37+5:302019-06-01T15:47:01+5:30

चांगला आहार हा कुणाच्याही आरोग्यासाठी चांगलाच असतो. काही पदार्थ असे असतात जे आरोग्यासाठी वरदानच असतात.

They are called sex super foods know their benefits | कमजोरी दूर करून 'हे' ५ सुपर फूड्स भरतील तुमच्या लैंगिक जीवनात नवा जोश, नवा उत्साह!

कमजोरी दूर करून 'हे' ५ सुपर फूड्स भरतील तुमच्या लैंगिक जीवनात नवा जोश, नवा उत्साह!

googlenewsNext

चांगला आहार हा कुणाच्याही आरोग्यासाठी चांगलाच असतो. काही पदार्थ असे असतात जे आरोग्यासाठी वरदानच असतात. तर काही पदार्थामुळे आरोग्याला समस्या होऊ शकते. वेगवेगळ्या आहाराचं वेगवेगळं महत्त्व असतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, असे काही फूड्स ज्यांना सेक्ससाठी सुपर फूड्स मानले जातात.

गुप्तांगाला ताठरता देते पालक 

Sexual life: Women body may changes like that during sex | लैंगिक जीवन : उत्तेजित झाल्यावर महिलांच्या शरीरात होतात

पालक गुप्तांगाच्या आरोग्यासाठी सर्वात चांगली मानली जाते. पालकमध्ये भूक कमी करणारे तत्त्व भरपूर असतात, सोबतच शरीराच्या खालच्या भागात रक्तप्रवाह वाढवण्यासही फायदेशीर असते. पालकमध्ये मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असतं. या खनिज तत्त्वामुळे शारीरिक संबंध ठेवताना गुप्तांगात रक्तप्रवाह वाढवण्यास आपली मदत करतं. अनेक लोकांना पालकाची आयर्नयुक्त टेस्ट आवडत नाही. पण लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी खासकरून गुप्तांगाची मजबूती वाढवण्यासाठी पालकाचं सेवन फायदेशीर ठरतं.

कॉफी पिणे फायदेशीर

You should know that partners special day, When they are the most desires of sex | लैंगिक जीवन :

कॉफी पिणे सुद्धा गुप्तांगाच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. पण याचा अर्थ हा नाही की, तुम्ही कॉफी जास्त प्रमाणात सेवन करू शकता. एका रिसर्चनुसार, जे लोक नियमितपणे दिवसातून २ ते ३ कप कॉफीचं सेवन करतात, त्यांच्यात इतरांच्या तुलनेत गुप्तांगासंबंधी समस्या होण्याचा धोका ४२ टक्क्यांनी कमी असतो. कॉफीमध्ये असलेलं कॅफीन उत्तेजक असतं. त्यासोबतच कॉफी प्यायल्याने जाडेपणा आणि रक्तदाब रुग्णांसाठीही फायदेशीर ठरते. जाडेपणा आणि उच्च रक्तदाब हे सुद्धा पुरूषांमध्ये लैंगिक क्षमता कमी होण्याचं कारण ठरू शकते.

कामेच्छा वाढवतं केळं

10 facts about sex you never knew | लैंगिक जीवन : अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील!

केळं हे बेस्ट पेनिस फूड्सपैकी एक आहे. तसेच केळं हृदयरोगाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर असतं. केळ्यामध्ये पोटॅशिअमचं प्रमाण भरपूर असतं. ज्याने हृदय निरोगी राहतं आणि रक्तप्रवाह वाढण्यासही फायदा होतो. नियमितपणे केळी खाल्ल्याने किंवा पोटॅशिअम असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात सोडियमचं प्रमाण नियंत्रित ठेवता येतं. नियमितपणे केळी खाल्ल्याने गुप्तांगाचं आरोग्य देखील चांगलं राहतं.

टोमॅटो आहे खास

जे पुरूष आठवड्यातून किमान १० टोमॅटो खातात, त्यांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत १८ टक्के कमी असतो. कारण टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतं जे विषारी पदार्थांशी लढतं. एका रिसर्चनुसार, नियमितपणे टोमॅटोचं सेवन केल्याने शुक्राणूच्या निर्मितीचा दर वाढण्यास मदत मिळते. याचा गुप्तांगाच्या आरोग्यासही फायदा मिळतो. त्यामुळे टोमॅटोचं नियमित सेवन करावं. 

कलिंगडाचे एकापेक्षा एक फायदे

कलिंगडामध्ये L-Citrulline नावाचा घटक असतो. हे आर्निथीनपासून तयार होणारं एक अमीनो अ‍ॅसिड आहे. जे कलिंगडात आढळतं. हे अमीनो अ‍ॅसिड गुप्तांगाचा आकार वाढवण्यासाठी आणि त्यात ताठरता वाढवण्यास फायदेशीर ठरतं. कलिंगडाचं नियमित सेवन केल्याने हा घटक शरीरात एल-आर्जिनीनमध्ये रुपांतरित होतो. याने शरीरात नायट्रिक ऑक्साइडच्या उत्पादनाला उत्तेजन मिळतं. याने गुप्तांगात रक्तप्रवाह वाढण्यास मदत मिळते.

Web Title: They are called sex super foods know their benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.