Study says Gonorrhea a sexually transmitted infection may also be found in the throat by doing french kiss | लैंगिक जीवन : डीप किसिंगमुळे होऊ शकतो गोनोरिया!
लैंगिक जीवन : डीप किसिंगमुळे होऊ शकतो गोनोरिया!

शारीरिक संबंधावेळी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ नेहमी देत असतात. कारण असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्याने वेगवेगळे आजार आणि वेगवेगळे गंभीर इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. तुम्ही जर गोनोरियाचं नाव ऐकलं असेल तर हा सुद्धा असुरक्षित शारीरिक संबंधातून होणारा आजार आहे. तसा तर हा आजार सामान्यपणे जेनिटल्समुळे पसरतो, पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, घशातही गोनोरिया होतो. हा गोनोरिया डीप किस किंवा फ्रेन्च किसिंगमुळेही पसरू शकतो. 

गोनोरियाचा धोका

सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, डीप किसींग ज्यात फ्रेन्च किसिंग आणि किसिंग दरम्यान जिभेचा वापर होतो. यामुळे गे किंवा बायसेक्शुअल पुरूषांच्या घशात गोनोरिया इन्फेक्शन होण्याचा धोका फार जास्त वाढतो. गोनोरिया रेक्टमसोबतच कंठ आणि डोळ्यातही होतो. यावर उपचार फार कठीण मानले जातात. कारण या इन्फेक्शनवर अनेकदा अ‍ॅंटीबायोटिक्सचा प्रभावही होत नाही. 

काय सांगतो रिसर्च?

पब्लिक हेल्थ कॅम्पेनर्सने लोकांना कंडोमचा वापर करून गोनोरिया होण्याचा धोका कमी करण्याचा सल्ला दिला आहे. पण नव्या रिसर्चमधून सांगण्यात आले की, लोकांना केवळ इतकाच सल्ला देणं पुरेसं नाही. फ्रेन्च किसिंग किंवा डीप किसिंगच्या माध्यमातून कंठात गोनोरिया होण्याचा असतो किंवा नाही, हे जाणून घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये पब्लिक हेल्थ सर्व्हिसने २०१६-१७ दरम्यान ३१०० पुरूषांची तपासणी केली. त्यांचा डेटा एकत्र केला. या रिसर्चमध्ये सहभागी लोक एकतर बायसेक्शुअल होते किंवा  गे होतो. असं करण्याचं कारण म्हणजे गोमोरिया हेट्रोसेक्शुअलच्या तुलनेत या कम्युनिटीमधील लोकांमध्ये अधिक आढळतो. 


Web Title: Study says Gonorrhea a sexually transmitted infection may also be found in the throat by doing french kiss
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.