(Image Credit : Answersafrica)

वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्स कायम राहणे गरजेचे आहे. दोघांचं चांगलं लैंगिक जीवन त्यांचं नातं आणखी मजबूत करतात. हे कुणापासूनही लपलेलं नाहीये की, महिला त्यांच्या बॉडी शेपबाबत नेहमीच विचार करत असतात. फिगरबाबत केलेल्या कमेंटवर त्या फार मनावर घेतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, महिला पार्टनरचं कौतुक केल्याने लव्ह लाइफ अधिक रोमॅंटिक होते. तुमच्याकडून होणाऱ्या कौतुकाने, प्रशंसेने त्यांना कम्फर्टेबल वाटत आणि शारीरिक संबंधावेळी त्या चांगलं परफॉर्म करू शकतात.

काय करावे?

तज्ज्ञ आणि थेरपिस्ट सांगतात की, जर तुम्ही पार्टनरचं कौतुक केलं तर तुमचे रोमॅंटिक क्षण अधिक चांगले होऊ शकतात. अनेकांना ही छोटी बाब वाटू शकते, पण याने मानसिक स्तरावर सकारात्मक प्रभाव पडतो. महिला सुद्धा त्यांच्या पार्टनरची प्रशंसा करून तुम्ही त्यांना सकारात्मक जाणीव करून देऊ शकता. जर शारीरिक संबंध ठेवताना पार्टनरच्या प्रशंसा केल्यावर सकारात्मक रिस्पॉन्स मिळत असेल तुम्ही ही ट्रिक वापरू शकता.

२०० महिलांवर केला अभ्यास

या रिसर्चमध्ये २०० महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांचं वय १० ते ३० वर्ष होतं. जर्नल ऑफ सेक्स अ‍ॅन्ड मॅरिटअल थेरपीमध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला. हा रिसर्च करण्यासाठी सहभागी महिलांना त्यांच्या शरीराबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. तसेच हेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला की, त्यांच्या बॉडीबाबत त्याचा पार्टनर काय विचार करतो.

तसेच यात महिलांना त्यांच्या लैंगिक जीवनाबाबतही काही प्रश्न विचारण्यात आले. त्यांना विचारण्यात आले की, त्यांना कितीवेळी ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो आणि त्यांना मिळालेल्या संतुष्टीचा स्तर काय अशतो. तसेच यावेळी त्यांना वेदना होतात का? हेही विचारण्यात आले.

काय निघाला निष्कर्ष?

What is Sex Addiction? Know it

या रिसर्चमधून समोर आलं की, ज्या महिलांना त्यांच्या लुक्स आणि फीगरबाबत पार्टनरकडून प्रशंसा मिळाली, त्या महिला शारीरिक संबंध ठेवताना जास्त आनंदी होत्या आणि त्यांना संतुष्टीचा अनुभव आला. तसेच या महिलांची लैंगिक क्षमताही त्या महिलांच्या तुलनेत अधिक होती, ज्या महिला त्यांच्या बॉडी आणि लूक्सबाबत आनंदी राहत नाहीत. त्यासोबतच रिसर्चमधून असेही समोर आले की, इंटिमेट क्षणांदरम्यान महिलांची प्रशंसा केली गेली तर त्यांची कामेच्छा वाढते.


Web Title: Study doing this one thing can make intimate relationship better
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.