Sex Life: You should know the types of female orgasm | लैंगिक जीवन : महिलांमध्ये किती प्रकारचा असतो ऑर्गॅज्म?
लैंगिक जीवन : महिलांमध्ये किती प्रकारचा असतो ऑर्गॅज्म?

पर्सनल रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध कोणत्याही टॉनिकपेक्षा कमी नाही. शारीरिक संबंध केवळ दोन शरीरांनाच एकत्र आणण्याची क्रिया नाही तर दोन व्यक्तींची भावनिक जवळीकताही असते. त्यामुळे एका हेल्दी रिलेशनशिपसाठी किंवा आनंदी वैवाहिक जीवनासाठी दोन्ही पार्टनरने एकमेकांच्या आनंदाची काळजी घेतली पाहिजे. पण नेहमीच एक प्रश्न समोर येतो की, महिलांना ऑर्गॅज्मचा अनुभव कसा होतो?  

ऑर्गॅज्म चार प्रकारचा असतो

वेगवेगळ्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, शारीरिक संबंधादरम्यान काही महिलांना एकापेक्षा अधिक वेळ ऑर्गॅज्म होऊ शकतो. तर काही महिलांना या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी फार वेळ लागतो किंवा कमीच वेळा त्यांना ऑर्गॅज्मचा अनुभव येतो. एक्सपर्ट्सनुसार ही स्थिती प्रत्येकासाठी वेगळी असते. सोबतच महिलांमध्ये ऑर्गॅज्म चार प्रकारचा असतो. त्यातील दोन प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

क्लिटोरल ऑर्गॅज्म

क्लिटोरल ऑर्गॅज्म हा सर्वात लवकर आणि वेगाने होणारा ऑर्गॅज्म मानला जातो. प्रायव्हेट पार्टमध्ये क्लिटोरिसवर सतत स्पर्श झाल्याने महिलांना फार लवकर ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो. ऑर्गॅज्मची ही स्थिती शारीरिक संबंध पूर्ण करणारी नाही तर गरज वाढवणारी मानली जाते. 

सर्विकल ऑर्गॅज्म

सर्विकल ऑर्गॅज्मला सर्वात बेस्ट ऑर्गॅज्म मानला जातो. सर्विकल ऑर्गॅज्मदरम्यान महिलांना शांती, सुख आणि आनंदाची, संतुष्टीची जाणीव होते. सर्विक्स गर्भाशय आणि यूट्रस यांच्यात एका धाग्याप्रमाणे काम करतं. या ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचण्यासाठी मिशनरी सेक्स पोजिशन सर्वात बेस्ट मानली जाते.


Web Title: Sex Life: You should know the types of female orgasm
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.