लैंगिक जीवन : पत्नी माझ्या 'त्या' साइजबाबत खूश नाही, यावर खरंच काही उपाय असतो का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 04:03 PM2020-03-16T16:03:44+5:302020-03-16T16:27:03+5:30

माझी पत्नी माझ्या प्रायव्हेट पार्टच्या साइजने आनंदी नाही. ती मला हेही बोलली की, माझ्या प्रायव्हेट पार्टच्या साइजमुळे तिचं सॅटिस्फॅक्शन होत नाही.

Sex Life: Wife complains about private part size, what is the solution? api | लैंगिक जीवन : पत्नी माझ्या 'त्या' साइजबाबत खूश नाही, यावर खरंच काही उपाय असतो का?

लैंगिक जीवन : पत्नी माझ्या 'त्या' साइजबाबत खूश नाही, यावर खरंच काही उपाय असतो का?

Next

(Image Credit : psychologytoday.com)

प्रश्न : माझी पत्नी माझ्या प्रायव्हेट पार्टच्या साइजने आनंदी नाही. ती मला हेही बोलली की, माझ्या प्रायव्हेट पार्टच्या साइजमुळे तिचं सॅटिस्फॅक्शन होत नाही. त्यामुळे मलाही निराशा आणि कमीपणा जाणवतो. कारण मलाही तिच्यासोबत संबंध एन्जॉय करता येत नाही. मी काय करावे?

उत्तर - मुळात संतुष्टी मिळण्यासाठी प्रायव्हेट पार्टची साइज अजिबात महत्वाची नाहीये. संतुष्टी प्रायव्हेट पार्टच्या साइजने नाही तर शारीरिक संबंधावेळी दोघांनी नवनवीन गोष्टी करून मिळू शकते. तसेच यात दोघांची मर्जी आणि इंटरेस्ट महत्वाचा आहे. संबंध एन्जॉय करण्यासाठी फोरप्लेच्या वेगवेगळ्या पद्धती शिकल्या पाहिजे. यानेच तुमचा आनंद दुप्पट होऊ शकतो. 

(Image Credit : telegraph.co.uk)

तेव्हाच तुम्हा दोघांना सेक्शुअल लाइफमध्ये पूर्ण आनंद मिळू शकेल. राहिला प्रायव्हेट पार्टच्या साइजचं तर महिल्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये उत्तेजना जाणवणारा अवयव हा केवळ दोन इंचाचा असतो, त्यावर तुमच्या प्रायव्हेट पार्टने घर्षण झाल्यावर त्यांना उत्तेजना जाणवते. त्यामुळे साइज जास्त असली म्हणजे संतुष्टी मिळते या गैरसमजात राहू नये. पॉर्न सिनेमे पाहून प्रायव्हेट पार्टची साइज तशीच मोठी असावी असा विचार करणं चुकीचं आहे. 

प्रश्न : मी ३२ वर्षांचा आहे आणि मी माझ्या प्रायव्हेट पार्टच्या साइजने खूश नाही. इरेक्ट झाल्यावर प्रायव्हेट पार्टची लांबी ४ ते ५ इंच होते. मला नेहमी वाटत होतं की, ही साइज अधिक असावी. यावर काही नैसर्गिक उपाय आहे का? मी माझ्या प्रायव्हेट पार्टची साइज वाढवू शकतो का? 

उत्तर - दुर्दैवाने असा कोणताही उपाय नाही. जर कुणी सांगत असेल तर तो वापरून स्वत:चं नुकसान करून घेऊ नका. तुमच्याकडे जे आहे, जेवढं आहे त्यात आनंदी रहा आणि त्याचाच पुरेपूर वापर करा. साइज सगळं काही नसते. तुम्ही वेगवेगळ्या क्रिया कशाप्रकारे करता तेही महत्वाचं आहे. यासाठी फोरप्ले शिका आणि ते अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा.


Web Title: Sex Life: Wife complains about private part size, what is the solution? api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.