लैंगिक जीवन : स्टॅमिना फारच कमी असल्याने इनिंग सुरू करताच संपते, काय करू?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 03:37 PM2020-03-11T15:37:48+5:302020-03-11T15:38:21+5:30

म्हणजे अ‍ॅक्ट सुरू केल्यावर काही मिनिटांमध्येच इजॅक्यूलेट करतो. ज्यामुळे पत्नीला पूर्ण संतुष्ट करू शकत नाही.

Sex Life: My stamina is very low what should i do? api | लैंगिक जीवन : स्टॅमिना फारच कमी असल्याने इनिंग सुरू करताच संपते, काय करू?

लैंगिक जीवन : स्टॅमिना फारच कमी असल्याने इनिंग सुरू करताच संपते, काय करू?

googlenewsNext

प्रश्न : माझं वय ३२ आहे आणि माझा सेक्शुअल स्ट्रमिना फारच कमी आहे. म्हणजे अ‍ॅक्ट सुरू केल्यावर काही मिनिटांमध्येच इजॅक्यूलेट करतो. ज्यामुळे पत्नीला पूर्ण संतुष्ट करू शकत नाही. मला परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी काय करावं लागेल?

उत्तर : तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी तुमच्या शारीरिक आरोग्यावर पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. सोबतच नियमितपणे कीगल एक्सरसाइज(पोटाखालील भागाची एक्सरसाइज) करा. याने ओटीपोट भागातील मांसपेशी मजबूत होतील आणि तुम्हाला स्वत:वर कंट्रोल करण्यास मदत मिळेल. तसेच फोरप्लेबाबत जास्तीत जास्त माहिती मिळवा, जेणेकरून तुमचे तुमचा अ‍ॅक्ट जास्त वेळ होईल. तसेच वेगवेगळ्या भाज्या आणि फळंही खावीत. खालील काही कारणांमुळेही तुम्ही पत्नीला संतुष्ट करू शकत नाही.

बोरिंग किंवा इमोशनलेस सेक्स

सेक्स लाइफ बोरिंग होणं किंवा इंटीमसीमध्ये प्रेम किंवा इमोशन नसणंही महिलांना पार्टनरपासून दूर करतं. तुम्ही जर पार्टनरसोबत केवळ फिजिकल इंटीमसीसाठी इन्वॉल्व होत असाल तर त्यांना याचा अजिबात आनंद मिळणार नाही. असं केल्याने महिला इमोशनली आणि फिजिकली इंटिमसीपासून दूरावा ठेवतात.

आकर्षण न वाटणे

महिला आपल्या लूकबाबत फार संवेदनशील असतात. वाढलेलं वजन किंवा पार्टनरला आकर्षण किंवा प्रेम न वाटणं याने त्यांचा त्यांच्या शरीराबाबतचा कॉन्फिडन्स कमी होऊ लागतो. असं झाल्यावर सेक्शुअल अक्टिविटीदरम्यान अजिबात सहजता वाटणार नाही. त्यांच्यासाठी सेक्शुअल अनुभव वाईट ठरेल.

सेक्शुअल फ्रस्ट्रेशन

जास्तीत जास्त महिला पार्टनरला हे सांगण्यात सहज नसतात की, शारीरिक संबंधावेळी त्यांना नेमकं काय हवंय किंवा त्यांना नेमकं काय आवडतं. ही बाब त्यांच्या प्लेजर आणि ऑर्गॅज्म फील करण्याच्या आडवी येते. हेच त्यांचं फ्रस्ट्रेशनचं कारण बनतं.

Web Title: Sex Life: My stamina is very low what should i do? api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.