लैंगिक जीवनात शारीरिक संबंधाबाबत एक सामान्य धारणा आहे की, महिलांना फोरप्ले अधिक पसंत असतो. मात्र, एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, पुरूषांना फोरप्ले महिलांपेक्षा अधिक पसंत असतो. यानुसार पुरूषांना शारीरिक संबंध ठेवण्याआधी पार्टनरसोबत जास्त वेळासाठी फोरप्ले करायचा असतो.

तसेच या रिसर्चमध्ये हेही सांगण्यात आले आहे की, अर्ध्यापेक्षा जास्त वेळ महिला ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचतात. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, १८ टक्के पुरूष आधीच ३० मिनिटांपर्यंत फोरप्ले सेशल करतात. तर एक तृतियांश लोकांना फोरप्लेचा कालावधी वाढवायचा असतो.

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, १० टक्के पुरूषांना फोरप्लेचा हा कालावधी वाढवून एक तास किंवा त्यापेक्षाही जास्त करायचा आहे. या सर्व्हेमधून ही धारणा चुकीची ठरवण्यात आली की, पुरूष फोरप्ले सेशनमध्ये केवळ पार्टनरला खूश करण्यासाठी भाग घेतात. तसेच अशीही धारणा होती की, त्यांचं लक्ष केवळ इंटरकोर्सवर असतं.

जेव्हा या सर्व्हेमध्ये सहभागी २ हजार पुरूषांनी या गोष्टीचा खुलासा केला की, त्यांना महिलांपेक्षा अधिक जास्त वेळ चालणारा फोरप्ले सेशन पसंत करतात. तर या सर्व्हेत सहभागी महिलांपैकी १७ टक्के महिलांनी सांगितले की, त्यांचा फोरप्लेचा सरासरी वेळ हा २५ मिनिटे असतो. तर यातील एक तृतियांश महिलांनी हे मान्य केलं की, त्यांच्यासाठी फोरप्लेचा परफेक्ट कालावधी २० ते ३० मिनिटे होता.

लव्हहनी अ‍ॅन्ड रिलेशनशिप एक्सपर्ट ट्रेसे कोक्स यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या सर्व्हेनुसार, फोरप्लेसोबतच पुरूषांना इंटरकोर्सचा कालावधीही जास्त हवाय, त्यांना वाटतं की, इंटरकोर्सचा कालावधी २० ते ३० मिनिटांचा असावा. तर १६ टक्के महिलांसाठी लव्ह मेकिंगचा यापेक्षा अर्धा वेळ परफेक्ट असतो.


Web Title: Men enjoy foreplay more than women
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.