जगभरात अशा अनेक महिला असतील ज्यांच्या लैंगिक जीवनात कधी ना कधी उदासीनता येतेच. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे की, वाढत्या वयात महिलांच्या कामेच्छेवर काय प्रभाव पडतो. या रिसर्चमधून समोर आलं आहे की, नियमितपणे शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलांचीही कामेच्छा वयासोबत कमी होते. तेच मेनोपॉजनंतर शारीरिक संबंध एन्जॉय करणाऱ्या महिलांची संख्या देखील आणखी कमी आढळली.

हे आहे कारण

मेनोपॉज: द जर्नल ऑफ द नॉर्थ अमेरिकन मेनोपॉज सोसायटीमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, जवळचं नातं, हेल्थ आणि सायकॉलॉजिकल फॅक्टर्स मेनोपॉजनंतर महिलांचे सेक्शुअल रिलेशन सॅटिस्फॅक्शनला प्रभावित करतात. त्यासोबतच मेनोपॉजशी संबंधित समस्या जसे की, व्हजायनामध्ये कोरडेपणा आणि शारीरिक संबंधावेळी होणाऱ्या वेदना ही सुद्धा कामेच्छा कमी होण्याची कारणे आहेत.

मानसिक-सामाजिक बदल

रिसर्चमध्ये फ्लॅशेज, स्लीप डिसरप्शन, व्हजायनल ड्रायनेस आणि पेनफुल इंटरकोर्ससारख्या समस्या बघण्यात आल्या आहेत. मेनोपॉजनंतर सायको-सोशल बदलांबाबत फार कमी माहिती आहे. जसे की, इमेज कंसर्न, सेल्स कॉन्फिडेन्स, स्ट्रेस, मूड चेंज आणि रिलेशनशिप समस्या.

पार्टनरची कंडीशन

आणखी काही वेगळी कारणे समोर आली आहेत. जसे की,  पार्टनरची मेडिरल कंडीशन, पार्टनरचा सेक्शुअल डिसफंक्शन, महिलांची हेल्थ आणि मेनोपॉजची लक्षणे.


Web Title: Effect of age on women sex drive
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.