युवकाच्या पोटावर कुऱ्हाडीने वार, पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 01:19 PM2019-09-16T13:19:48+5:302019-09-16T13:20:59+5:30

घरगुती कारणातून उकेश विजय काळे (वय ३०, रा. बेघरवस्ती, मर्ढे ता. सातारा) याच्या पोटावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले असून, जखमी काळे याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

 The young man was hit by an ax on the stomach, and two were booked at the police station | युवकाच्या पोटावर कुऱ्हाडीने वार, पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा

युवकाच्या पोटावर कुऱ्हाडीने वार, पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा

Next
ठळक मुद्दे युवकाच्या पोटावर कुऱ्हाडीने वार पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा

सातारा : घरगुती कारणातून उकेश विजय काळे (वय ३०, रा. बेघरवस्ती, मर्ढे ता. सातारा) याच्या पोटावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले असून, जखमी काळे याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दर्या खटपट्या भोसले, अल्लासारख्ख्या खटपट्या भोसले (रा. मालगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. घरगुती कारणातून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

जखमी उकेश काळे याचा भाऊ सोहेल काळे यालाही लाथाबुक्क्यांनी संबंधित आरोपींनी मारहाण केली. रात्री उशिरापर्यंत आरोपींना अटक झाली नव्हती.

Web Title:  The young man was hit by an ax on the stomach, and two were booked at the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.