दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू, मित्र जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:32 AM2020-06-13T11:32:24+5:302020-06-13T11:34:27+5:30

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र जखमी झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सोनगाव, ता. सातारा येथील सातारा पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात झाला.

Young man killed, friend injured | दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू, मित्र जखमी

दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू, मित्र जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देदुचाकी घसरून युवकाचा मृत्यू, मित्र जखमीसातारा तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद

सातारा : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र जखमी झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सोनगाव, ता. सातारा येथील सातारा पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात झाला.

शिवराज बाळकृष्ण कदम (वय २७, रा. जकातवाडी, ता. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शिवराज कदम आणि अन्य एक युवक दुचाकीवरून सातारा पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातून सोनगावकडे येत होता.

यावेळी अचानक दुचाकी घसरल्याने शिवराज कदम हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या अन्य एक युवकही जखमी झाला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

 

Web Title: Young man killed, friend injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.