महाबळेश्वर तहसिलदार कार्यालयाशेजारी दिसला पांढऱ्या रंगांचा शेकरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:08 PM2021-01-16T12:08:47+5:302021-01-16T12:10:46+5:30

Mahabaleshwar Hill Station Satara area -महाबळेश्वर तहसिलदार कार्यालयाच्या शेजारी महाबळेश्वर येथील भूमिअभिलेख कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या नरक्या जातीच्या झाडाचे फळे खाताना स्थानिक नागरिकाना पांढऱ्या रंगांचा शेकरू प्रथमच या भागात दिसला.

A white shekru was seen near Mahabaleshwar tehsildar's office | महाबळेश्वर तहसिलदार कार्यालयाशेजारी दिसला पांढऱ्या रंगांचा शेकरू

महाबळेश्वर तहसिलदार कार्यालयाशेजारी दिसला पांढऱ्या रंगांचा शेकरू

googlenewsNext
ठळक मुद्देमहाबळेश्वर तहसिलदार कार्यालयाशेजारी दिसला पांढऱ्या रंगांचा शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी

महाबळेश्वर : तहसिलदार कार्यालयाच्या शेजारी महाबळेश्वर येथील भूमिअभिलेख कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या नरक्या जातीच्या झाडाचे फळे खाताना स्थानिक नागरिकाना पांढऱ्या रंगांचा शेकरू प्रथमच या भागात दिसला.

 महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू अर्थातच शेकरा [ Indian giant squirrel – Ratufa indica ]या नावाने परीचीत असलेली खार म्हटली की इटुकली पिटुकली, गोंडस झुपकेदार शेपुट इकडे तिकडे उडवत तुरुतुरू पळणारा प्राणी आपल्या नजरे समोर येतो. पण शेकरु मात्र खारीच्या ह्या वर्णनाच्या अगदी उलट आहे अस म्हणू शकतो.

शेपटीसकट साधारंण तीन ते साडेतीन फ़ुट लांबीची ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. तहसीलदार कार्यालयानजीक नरक्याच्या झाडावर संपूर्ण पांढऱ्या रंगाचे दुर्मिळ शेकरू शुक्रवारी सकाळी पाहावयास मिळाले शेकरूंची पाठ तपकिरी,पिवळसर-पांढरा गळा,छाती, पोट,तोंडावर रुबाबदार लांब मिशा,लांब सुळ्यासारखे दात, पायाला टोकदार वाकडी नखे असतात.

मात्र या पांढऱ्या रंगाच्या शेकरुंचे डोळे गुलाबीसर तर संपूर्ण पांढरे असल्याचे दिसून आले येथील एमटीडीसी मध्ये देखील अश्याच प्रकारचे एक शेकरू पाहावयास मिळाले होते. इंग्रजीमध्ये शेकरूस ''इंडियन जायंट स्क्विरल' नावाने ओळखला जाते. येथील एमटीडीसी मध्ये देखील आश्याच प्रकारचे एक पांढरे शेकरू दिसून आले होते.


 

Web Title: A white shekru was seen near Mahabaleshwar tehsildar's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.