प्रदूषण अन् प्लास्टिकमुक्त साताऱ्यासाठी प्रयत्न करू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 07:09 PM2020-01-11T19:09:50+5:302020-01-11T19:12:04+5:30

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद-- जिल्ह्यात काम करण्यास मोठा वाव आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्या लोकांना नेहमीच आपुलकीची सेवा मिळेल. तसेच तालुकास्तरावर बैठका घेऊन उपाययोजना केल्या जातील. - उदय कबुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा

We will try to avoid pollution and plastic free. | प्रदूषण अन् प्लास्टिकमुक्त साताऱ्यासाठी प्रयत्न करू..

प्रदूषण अन् प्लास्टिकमुक्त साताऱ्यासाठी प्रयत्न करू..

Next
ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनालाही राहणार प्राधान्य

नितीन काळेल।

सातारा : सातारा जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर पोहोचलाय. हा नावलौकिक कायमस्वरुपी टिकण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग करणार आहे. त्याचबरोबर जिल्हा स्वच्छतेत पुढे असून, यापुढे पर्यावरणयुक्त आणि प्लास्टिक व प्रदूषणमुक्त साताºयासाठी प्रयत्न केला जाईल,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष उदय कबुले यांनी व्यक्त केला. याचबरोबर त्यांनी आगामी दोन वर्षांत काय-काय करता येईल यावर प्रकाशझोत टाकला.

प्रश्न : अध्यक्ष म्हणून नवी जबाबदारी मिळालीय, ती कशी पेलणार आहात ?
उत्तर : आ. मकरंद पाटील यांच्या माध्यमातून उच्च पदावर काम करण्याची संधी मिळालीय. हे काम आव्हानात्मक असले तरी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न राहील. जिल्हा परिषदेत येणाºया प्रत्येकाचे काम कसे वेळेवर होईल, याकडे लक्ष दिले जाईल. कारण, येथे येणारा हा समस्या, कामे घेऊनच येत असतो. त्यामुळे विनाविलंब त्यांची कामे करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.

प्रश्न : सभागृहात विरोधकांचे सहकार्य मिळेल काय ?
उत्तर : नक्कीच मिळेल. कारण, मी कोणालाच विरोधक मानत नाही. स्थानिक पातळीवर काम केल्याचा मला अनुभव आहे. विरोधकांनाही लोकांनी निवडून दिले आहे. त्यांचीही कामे झालीच पाहिजेत. त्यांनाही अधिकार आहे. आम्ही मिळून-मिसळून काम करू. आवश्यक तेथे त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल.

प्रश्न : अधिकाऱ्यांबाबत आपले मत काय ?
उत्तर : येथील अधिकाºयांचा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्यात मोठा वाटा आहे. सर्व विभागांना बरोबर घेऊन काम करण्यात येईल. त्यांच्या सहकार्यातून लोकांची कामे लवकर कशी होतील, हे पाहिले जाईल.


गावपातळीवर प्लास्टिकमुक्ती...
जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पत्रव्यवहार करून प्लास्टिक बंदबाबत सांगण्यात येईल. कोठे विक्री होत असेल तर कारवाई करण्यास सांगू; पण एखादी ग्रामपंचायत याबाबत पावले उचलत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासारखे पाऊल उचलले जाईल. जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी असा निर्णय घ्यावाच लागेल.
महिला स्वावलंबन, शेतीला प्राधान्य...

जिल्ह्यातील महिला स्वावलंबी व्हाव्यात. यासाठी शासनाच्या योजना गावपातळीवरील महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच जिल्ह्यात हजारो शेतकरी आहेत. मी ही शेतकरी कुटुंबातीलच आहे. त्यामुळे कृषीला प्राधान्य देणार आहे. त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊनच काम करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेचा नावलौकिक होईल, असे काम मागीलप्रमाणे आताही केले जाईल.

Web Title: We will try to avoid pollution and plastic free.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.