निढळ गावाचा विकास पाहण्यासाठी ९५ अधिकारी देणार भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 07:23 PM2020-01-15T19:23:12+5:302020-01-15T19:24:25+5:30

गावातील व पंचक्रोशीतील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संधी आहे. यशदा येथे या सर्व अधिकाऱ्यांना दळवी यांनी नुकतेच ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ आणि ‘शासकीय अधिकारी म्हणून जनहिताचे व प्रभावी काम कसे करावे,’ या विषयावर प्रशिक्षण दिले आहे .

Visit to 90 officers to see the development of the abandoned village | निढळ गावाचा विकास पाहण्यासाठी ९५ अधिकारी देणार भेट

निढळ गावाचा विकास पाहण्यासाठी ९५ अधिकारी देणार भेट

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत २०१७ आणि २०१८ या वर्षी झालेल्या स्पर्धा परीक्षेतून संपूर्ण महाराष्ट्रातून यशस्वी झालेले हे सर्व अधिकारी आहेत.

सातारा : खटाव तालुक्यातील निढळ गावाच्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी ३४ उपजिल्हाधिकारी ३२ तहसीलदार आणि २९ नायब तहसीलदार असे एकूण ९५ वर्ग-१ चे अधिकारी आणि वर्ग-२ मध्ये नवीनच निवड झालेले शासकीय अधिकारी गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी निढळ गावास भेट देणार आहेत. यामध्ये २० महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, अशी माहिती सेवानिवृत्त आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत २०१७ आणि २०१८ या वर्षी झालेल्या स्पर्धा परीक्षेतून संपूर्ण महाराष्ट्रातून यशस्वी झालेले हे सर्व अधिकारी आहेत.

गावातील व पंचक्रोशीतील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संधी आहे. यशदा येथे या सर्व अधिकाऱ्यांना दळवी यांनी नुकतेच ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ आणि ‘शासकीय अधिकारी म्हणून जनहिताचे व प्रभावी काम कसे करावे,’ या विषयावर प्रशिक्षण दिले आहे .

एक दिवसाच्या दौºयामध्ये हे अधिकारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व विकासकामांची पाहणी करतील व विविध पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधतील. सांयकाळी ५ वाजता ग्रामपंचायत सभागृहामध्ये या अधिका-यांचे शंका निरसन व मार्गदर्शन असा कार्यक्रम असेल. सांयकाळी ६ते ७ वाजेपर्यंत निढळमधील व पंचक्रोशीतील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया तरुण-तरुणींसोबत हे ९५ नवनियुक्त तरुण अधिकारी चर्चा, प्रश्नोत्तरे व मार्गदर्शन करतील. या सर्व तरुण अधिकाºयांशी आपल्या तरुणांना सवांद साधता येईल. तरी याचा गावातील व पंचक्रोशीतील तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दळवी यांनी केले आहे.

 

Web Title: Visit to 90 officers to see the development of the abandoned village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.