वासोटा किल्ल्यावरून शिवसागर जलाशयाचे दृश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:40 AM2021-01-25T04:40:25+5:302021-01-25T04:40:25+5:30

२४लक्ष्मण गोरे ०००००००००० पाण्याची नासाडी सातारा : कास तलावातील पाणी पातळी कमी होत आहे. त्याचप्रमाणे आगामी काळात पाणी टंचाईचा ...

View of Shivsagar Reservoir from Vasota Fort | वासोटा किल्ल्यावरून शिवसागर जलाशयाचे दृश्य

वासोटा किल्ल्यावरून शिवसागर जलाशयाचे दृश्य

Next

२४लक्ष्मण गोरे

००००००००००

पाण्याची नासाडी

सातारा : कास तलावातील पाणी पातळी कमी होत आहे. त्याचप्रमाणे आगामी काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तरीही साताऱ्यातील अनेक भागातील नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे.

००००००

यात्रांवर परिणाम

सातारा : कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी झालेली दिसत असली तरी धोका कमी झालेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनांनुसार जिल्ह्यातील मोठ्या यात्रा-उत्सव रद्द करण्यात येत आहेत. त्यांना यात्रा कमिटीचा पाठिंबा मिळत असून भाविकांमधूनही प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यात्रेत गर्दी टाळण्यास मदत होते.

०००००००

वणव्याविरोधी मोहीम

सातारा : साताऱ्यातील कास, यवतेश्वरसह परिसरातील डोंगरांना उन्हाळ्यात वणवे लावले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वन्यसंपदा जळून नष्ट होते. याची वेळीच दखल घेऊन स्थानिक नागरिकांनीच वणव्यांविरोधात जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे. त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

---------

चाराटंचाई मिटली

दहिवडी : माण तालुक्यातील अनेक भागात यंदा चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काही अंशी मिटली आहे. काही शेतकरी परिसरातील गावांतून चारा विकत आणत आहेत.

०००

साईडपट्ट्या खचल्या

नागठाणे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र चांगल्या प्रमाणात प्रशस्त्र रस्ता आहे. मात्र ग्रामीण भागातील रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वेळीच दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे.

००००००

बसस्थानकांत पाण्याची सोय करावी

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकात प्रवाशांची संख्या वाढत आहे. उन्हाळ्याची चाहुल लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकात पाण्याची सोय करावी. तसेच ज्या ठिकाणी पूर्वीच्या टाक्या आहेत. त्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी प्रवासी मित्रांमधून करण्यात येत आहे.

००००

कार्यालयांत गर्दी

सातारा : कोरोना काळात संसर्गाचा धोका वाढत असल्याने शासकीय कार्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र आता बहुतांश शासकीय कार्यालयात वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. मास्क लावण्याबाबत आठवण करावी लागते.

००००००

सेवारस्ता उखडलेला

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीत सेवा रस्ता मोठ्या प्रमाणावर आहे. याची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. पुण्याकडून साताऱ्याकडे येण्याच्या दिशेला असलेला सेवा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

०००००

गाड्या पंक्चर वाढले

सातारा : जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे गाड्यांचे टायर, ट्यूब पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक दिवस एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्यांच्या ट्यूबचे पॅचेच उचकटत आहेत. त्यामुळे नागरिकांना वेळप्रसंगी गाडी चालवत न्यावी लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत असतो.

०००००००००

घाटातील रस्ता प्रशस्त

खंडाळा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातील रस्ते प्रशस्त आहेत. त्यामुळे घाटातून वाहने चालविणे एक आल्हाददायी अनुभव आहे. रस्ता रुंद व चकाचक डांबरीकरण झालेला असल्याने कमी वेळेत घाट उतरुन वाहने खाली येत आहेत.

००००००००

लिंबांचे दर वाढले

सातारा : साताऱ्यातील महात्मा फुले बाजारात रविवारी लिंबांचे दर अचानक कडाडले आहेत. सर्वसाधारणपण दहा रुपयांना दहा लिंबे मिळत आहेत. त्यामुळे यंदाच्या बाजारात लिंबांना मागणी कमी होती. या तुलनेत गेल्या आठवड्यात दर कमी होते.

००००००००

साताऱ्याच्या पश्चिम भागात बिबट्याचा वावर

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागातील यवतेश्वर घाट व पायथ्याला काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. याबाबत साताऱ्यातील नागरिकांमध्ये चर्चा वाढल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच पहाटे फिरायला जाणाऱ्यांनीही काळजी घेण्याची गरज आहे. अतिशय अंधार असताना जाण्याऐवजी उजेडल्यानंतर जाण्याचे आवाहन केले जात आहे.

०००००००

एसटी फेऱ्या वाढवा

सातारा : राज्य शासनाने पाचवी ते आठवीपर्यंत वर्ग सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांतील मुलांना शाळेसाठी शेजारील गावात जावे लागणार आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळानेही ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.

०००००००००

द्राक्षे बाजारात दाखल

सातारा : साताऱ्याचा आठवडा बाजार रविवारी भरत असतो. या बाजारात द्राक्षांची आवक होऊ लागली आहे. सध्या दर तेजीत असले तरी त्यांना सातारकरांमधून मागणी वाढत आहे. पिवळे व काळे दोन्ही प्रकारचे द्राक्षे महात्मा फुले बाजार समितीत आले आहेत.

००००००००

भाजी मंडईत वाहन तळ केल्याने गैरसोय

सातारा : साताऱ्यातील जुना मोटार स्टॅण्ड परिसरातील महात्मा फुले भाजी मंडईत दर रविवारी आठवडा बाजार भरतो. यासाठी ग्रामीण भागातून शेतकरी कृषी माल विक्रीसाठी घेऊन येतात. ताज्या व चांगल्या भाज्या मिळत असल्याने हजारो सातारकर मंडईत येत असतात. पण काही वाहनचालक मंडईच्या गेटच्या आतमध्ये दुचाकी गाड्या उभ्या करत असतात. त्यामुळे त्यातून ये-जा करताना ज्येष्ठ नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

०००००००

१२जावेद०५

मोकाट जनावरांमुळे कोंडी

साताऱ्यातील अनेक रस्त्यावर मोकाट जनावरे फरत असतात. त्यांचा त्रास सातारकरांना सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या मधोमधच ते थांबत असतात. वाहनचालकांनी कितीही हॉर्न वाजविला तरी ते हालत नाहीत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. (छाया : जावेद खान)

Web Title: View of Shivsagar Reservoir from Vasota Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.