पारगाव तलावात उरमोडी जलसिंचनचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:38 AM2021-04-15T04:38:50+5:302021-04-15T12:13:57+5:30

Water Satara : खटाव तालुक्यातील पारगाव तलावाची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली, तसेच उरमोडी जलसिंचन प्रकल्पाचे पाणी पारगाव तलावात सोडण्याचा शुभारंभही केला.

Urmodi irrigation water in Pargaon lake | पारगाव तलावात उरमोडी जलसिंचनचे पाणी

पारगाव तलावात उरमोडी जलसिंचनचे पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देपारगाव तलावात उरमोडी जलसिंचनचे पाणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी तलावाची केली पाहणी

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पारगाव तलावाची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली, तसेच उरमोडी जलसिंचन प्रकल्पाचे पाणी पारगाव तलावात सोडण्याचा शुभारंभही केला.

यावेळी सुरेश पाटील, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संतोष घार्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पवार, बाजार समितीचे उपसभापती अनिल माने, पुसेसावळीचे सरपंच दत्तात्रय रुद्रुके,राजाचे कुर्ले गावचे सरपंच समरजित राजेभोसले, महेश पाटील, रावसाहेब माने, छन्नूसिंग पाटील, नंदकुमार सोलापुरे, जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता व्ही. एम. बनसोडे, शाखा अभियंता डी. बी. गुळीग, शाखा अभियंता एस. डी. चव्हाण आदी उपस्थित होते.

दरम्यान, पारगाव व परिसरातील गावाच्या शेतीला वरदान ठरलेल्या तलावात उरमोडी प्रकल्पाचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सुचनांमुळे व जलसंपदा विभागाने केलेल्या योग्य नियोजनामुळे उन्हाळ्यामध्येही शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. हा तलाव परिसरातील शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला आहे.

 

Web Title: Urmodi irrigation water in Pargaon lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.