साताऱ्यात दोन कारची तोडफोड, अज्ञातावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 04:16 PM2020-01-20T16:16:16+5:302020-01-20T16:20:17+5:30

सातारा येथील मंगळवार पेठेतील रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या दोन कारची अज्ञाताने मध्यरात्री तोडफोड केल्याची घटाना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका चारचाकी मालकाने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Two cars vandalized, seven offenses in unknown: Vehicle panic | साताऱ्यात दोन कारची तोडफोड, अज्ञातावर गुन्हा

साताऱ्यात दोन कारची तोडफोड, अज्ञातावर गुन्हा

Next
ठळक मुद्देसाताऱ्यात दोन कारची तोडफोड, अज्ञातावर गुन्हा वाहन चालकांमध्ये घबराट

सातारा : येथील मंगळवार पेठेतील रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या दोन कारची अज्ञाताने मध्यरात्री तोडफोड केल्याची घटाना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका चारचाकी मालकाने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार पेठेतील काशी विश्वेश्वरय्या मंदिराच्यावरील बाजूस शनिवारी रात्री दोन चारचाकी गाड्या पार्किंग केलेल्या होत्या. मध्यरात्री अज्ञातांनी या दोन्ही गाड्यांच्या काचांची तोडफोड करुन नुकसान केले.

रविवारी सकाळी ज्येष्ठ नागरिक फिरायला जात असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी ही घटना संबंधित गाडी मालकांना सांगितली. सुनील तात्याबा साळुंखे (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांची बोलेरो गाडी फोडल्याचे समोर आले.

त्यानंतर सुनील साळुंखे यांनी तत्काळ शाहुपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या चारचाकी मालकाने अद्याप कोणतीही तक्रार पोलिसांत दाखल केली नसून अज्ञातांची दहशत असल्याचे बोलले जात आहे. दोन कारची तोडफोड केल्याची माहिती परिसरात समजल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. लवकरच हुल्लडबाज सापडतील, असा विश्वास पोलिसांना आहे. पोलीस हवालदार कुमठेकर हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Two cars vandalized, seven offenses in unknown: Vehicle panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.