मतदानावेळी गाडीवर पक्षाचे चिन्ह, आचारसंहिता भंग केल्याचा एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:18 AM2019-04-24T11:18:42+5:302019-04-24T11:19:53+5:30

मतदानाला सकाळी सुरुवात झाल्यानंतर गाडीवर पक्षाचे चिन्ह लावून फिरणाऱ्या एका व्यक्तीवर शहर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

At the time of voting, the crime of one of the party's symbol, violation of the Code of Conduct | मतदानावेळी गाडीवर पक्षाचे चिन्ह, आचारसंहिता भंग केल्याचा एकावर गुन्हा

मतदानावेळी गाडीवर पक्षाचे चिन्ह, आचारसंहिता भंग केल्याचा एकावर गुन्हा

Next
ठळक मुद्देमतदानावेळी गाडीवर पक्षाचे चिन्हआचारसंहिता भंग केल्याचा एकावर गुन्हा

सातारा : मतदानाला सकाळी सुरुवात झाल्यानंतर गाडीवर पक्षाचे चिन्ह लावून फिरणाऱ्या एका व्यक्तीवर शहर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

विक्रम शांताराम पवार (रा. गोळीबार मैदान, गोडोली सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. विक्रम पवार यांच्या गाडीवर भाजपचे तालुका अध्यक्ष आणि कमळ हे चिन्ह असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी पवार यांना अडविले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला.

Web Title: At the time of voting, the crime of one of the party's symbol, violation of the Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.