अपक्ष बदलणार तीन मतदारसंघांचं ‘गणित’! -अंदाज बांधणे अंधारातील तीरासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:32 PM2019-10-15T23:32:42+5:302019-10-15T23:35:07+5:30

आता अपक्ष उतरलेत. त्यांना मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा आहे; पण हा पाठिंबा बोलण्यातून आहे की करणीतून हे कळायला मार्ग नाही. जर सर्वपक्षीय नेत्यांचा तन, मन, धनाने पाठिंबा राहिल्यास देशमुख दोघा बंधूंना भारी ठरू शकतात.

Three constituencies will change the 'mathematics'! | अपक्ष बदलणार तीन मतदारसंघांचं ‘गणित’! -अंदाज बांधणे अंधारातील तीरासारखे

अपक्ष बदलणार तीन मतदारसंघांचं ‘गणित’! -अंदाज बांधणे अंधारातील तीरासारखे

Next
ठळक मुद्देक-हाड दक्षिण-उत्तर अन् माणमधील स्थिती; अटीतटीच्या तिरंगी लढतीचा परिणाम

नितीन काळेल ।

सातारा : जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघांत चुरीशीच्या लढती होत असल्यातरी कºहाड दक्षिण, क-हाड उत्तर आणि माणमध्ये तुल्यबळ असणारे अपक्षच स्वत:सह दुसऱ्यांचे भवितव्य ठरविणार आहेत. त्यामुळे या तीन मतदारसंघांतील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? याचा अंदाज बांधणे सद्य:स्थितीत तरी अंधारात तीर मारण्यासारखे होईल.
क-हाड दक्षिण मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार, तर भाजपकडून डॉ. अतुल भोसले, अपक्ष उदयसिंह पाटील रिंगणात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत चव्हाण आणि भोसले रिंगणात होते. त्यावेळी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे अपक्ष म्हणून उतरलेले. यावेळी त्यांचा मुलगा उदयसिंह हे खिंड लढवतात. आताही निवडणूक अटीतटीची होईल; पण यावेळी चुरस अधिक आहे. मागे पराभूत झाल्यानंतर भोसलेंनी मतदारसंघात बांधणी केली तसेच लोकसंपर्कही वाढवला. त्यांच्या पाठीमागे युतीची ताकद आहेच. त्याचबरोबर त्यांचा गटही येथे मजबूत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी अस्तित्वापेक्षा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कारण देशपातळीवर नेतृत्व करणाºया चव्हाणांना पुन्हा विजय मिळवावाच लागेल. येथे काँग्रेसमधील काहीजण भाजपात गेलेत. तरीही चव्हाण जोरदारपणे खिंड लढवतात. त्यांच्यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद राहील. तर मतदारसंघ उंडाळकरांचा बालेकिल्ला राहिलेला. या जोरावर उदयसिंहांनाही गट मजबूत करणे व अस्तित्वासाठी निकराची लढाई लढावी लागतेय. उदयसिंह पाटील किती मते घेतात, यावरच त्यांच्यासह चव्हाण आणि अतुल भोसलेंचेही गणित अवलंबून असेल.

क-हाड उत्तरमध्ये कोणाचे पारडे जड राहणार? हे आता सांगणे कठीण आहे. यावेळी राष्ट्रवादीकडून आमदार बाळासाहेब पाटील, शिवसेनेकडून धैर्यशील कदम तर अपक्ष म्हणून भाजपचे बंडखोर मनोज घोरपडे आहेत. २०१४ लाही या तिघांतच सामना रंगलेला. यावेळचा फरक म्हणजे पाटील राष्ट्रवादीतच असून, कदमांनी ‘हात’ सोडून बाण घेत नेम धरलाय. तर मतदारसंघ सेनेकडे गेल्याने घोरपडे अपक्ष उभे राहिलेत. आमदार पाटलांचा हा बालेकिल्ला राहिलाय. स्वत:बरोबरच पक्षाची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. मात्र, काँग्रेसमधील काहीजण कदम आणि घोरपडेंबरोबर आहेत. याठिकाणी आघाडीत बिघाडी झालीय. त्यामुळे पाटलांची दमछाक होऊ शकते. तर धैर्यशील कदम यांच्यासाठी युतीची ताकद आहे. तसेच त्यांचा एक गटही जमेची बाजू ठरलीय. अपक्ष मनोज घोरपडेंनी यावेळीही निवडणुकीत रंगत आणलीय. गावोगावी जाऊन चांगला संपर्क वाढवलाय. मागीलवेळची तिघांचीही मते पाहता आता कोण वरचढ ठरेल, हे सांगता येत नाही. घोरपडेंच्या मतावरच कोणाच्याही जय-पराजयाचा तराजू राहणार आहे.


देशमुखांना पाठिंबा बोलण्यातून का कृतीतून...
माण मतदारसंघात माजी आमदार जयकुमार गोरे आणि शेखर गोरे या भावातच निवडणुकीचे द्वंद्व होईल, अशी स्थिती सुरुवातीला होती; पण नंतर ‘आमचं ठरलंय’मधून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख रणांगणात उतरले. त्यांना ‘आमचं ठरलंय’मधील सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अपक्ष देशमुख यांनी भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यासमोर खऱ्या अर्थाने कडवे आव्हान उभे केले आहे.

जयकुमारांच्या मागे भाजपची ताकद आहे; पण यामध्येही फाटाफूट झालीय. तर गेली दहा वर्षे आमदार असल्याने ते मजबूत गट बांधून आहेत. विकासकामे आणि पाणी आणल्याच्या मुद्द्यावर ते मतदारांना सामोरे जातायत. शेखर गोरे यांचाही स्वत:चा गट आहे. शिवसेनेची असणारी ताकद मागे आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी केलेली तयारी त्यांना कुठपर्यंत घेऊन जाते, ते पाहावे लागेल. प्रभाकर देशमुख हे राष्ट्रवादीचे.

आता अपक्ष उतरलेत. त्यांना मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा आहे; पण हा पाठिंबा बोलण्यातून आहे की करणीतून हे कळायला मार्ग नाही. जर सर्वपक्षीय नेत्यांचा तन, मन, धनाने पाठिंबा राहिल्यास देशमुख दोघा बंधूंना भारी ठरू शकतात. देशमुख किती मते घेणार? यावरच गोरे बंधूंसह त्यांचेही अस्तित्व अवलंबून असेल.

Web Title: Three constituencies will change the 'mathematics'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.