शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टार्गेट २३ लाख; ४० लाख रोपे तयार! हरित साताऱ्याकडे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 20:36 IST

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सातारा जिल्ह्याला २३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सद्य:स्थितीत वनविभागाकडे २५ लाख व इतर विभागांची मिळून सुमारे ४० लाख झाडे तयार आहेत

नितीन काळेल

सातारा : राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सातारा जिल्ह्याला २३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सद्य:स्थितीत वनविभागाकडे २५ लाख व इतर विभागांची मिळून सुमारे ४० लाख झाडे तयार आहेत. त्यामुळे यावर्षीही जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक काम होणार आहे. तर दुसरीकडे वन विभागाकडील झाडे जगण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक असून, उन्हाळ्यात टँकरने झाडांना पाणी घालण्यात आले होते.

राज्य शासनाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. पहिल्या २०१७ यावर्षी राज्यात ४ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यामध्ये सातारा जिल्ह्याला ७ लाख ६३ हजार वृक्ष लागवडीचे तर वन विभागाला ४ लाख ७८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात वनविभागाने ५ लाख ३९ हजार झाडे लावली. यावर्षी जिल्ह्यात २३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, वन विभागाला त्यापैकी १३ लाख २५ झाडे लावायची आहेत. असे असलेतरी प्रत्यक्षात वनविभागाने १६ लाख झाडांचे नियोजन केले आहे.

१ ते ३१ जुलै असा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम असून, सद्य:स्थितीत वन विभागाकडे सध्या २५ लाख रोपे तयार आहेत. तर सामाजिक वनीकरण विभाग व कृषी विभागाकडेही रोपे तयार असून, हा आकडा ४० लाखांवर जाणारा आहे. त्यामुळे दुसºया वर्षीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणार आहे. त्यादृष्टीने वनविभाग व इतर विभागांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.२८ नर्सरीच्या ठिकाणी रोप निर्मिती...वनविभागाच्या जिल्'ात २८ नर्सरी आहेत. त्यामध्ये रोपे तयार करण्यात आली आहेत. लिंब, शिसव, बाभूळ, खैर, कवठ, जांभूळ, आपटा, उंबर, गुलमोहर, चाफा, फणस, चिंच, गूळभेंडी, काशीद, हिवर, सीताफळ, वड, पिंपळ आदी रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.पाच लाखांवर रोपे जगली...गेल्यावर्षी वन विभागाने त्यांच्या हद्दीत ५ लाख ३९ हजार रोपे लावली होती. त्यामधील ५ लाख २० हजारांवर रोपे आॅक्टोबरअखेर जगली होती. तर उन्हाळ्यात आवश्यक त्या ठिकाणच्या रोपांना पाणी देण्यात येऊन ती जगविण्यात आली. त्यामुळे गेल्यावर्षी लावण्यात आलेली ९० टक्क्यांच्यावर रोपे वनविभागाने जगविली आहेत.- जिल्'ातील वनविभागाचे एकूण क्षेत्र १ लाख १८ हजार १७४ हेक्टर- सर्वात अधिक क्षेत्र महाबळेश्वर तालुका- पाटण तालुक्यातही मोठ्या प्रमाणात क्षेत्र- यावर्षीच्या लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम पूर्णत्वाकडे- यावर्षी वनविभागाच्या १०७ जागेवर वृक्षारोपणाचे नियोजन- १६०० हेक्टर क्षेत्रावर झाडे लावण्यात येणार 

जुलैपासून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. यावर्षी वन विभागाच्या १०७ ठिकाणावर ही झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी खड्डेही खोदण्यात आले आहेत. विविध संस्था, शाळांचा या लागवडीत सहभाग घेणार आहे.- अनिल अंजनकर, उपवनसंरक्ष वनविभाग

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग