चार मित्रांना सोबत घेऊन घेतला बदला --साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 04:54 PM2020-02-12T16:54:21+5:302020-02-12T16:56:16+5:30

. वाघमोडे याचा मित्र मराठा पॅलेसमध्ये पूर्वी काम करत होत्या. त्यावेळी त्याच्या मालकासोबत त्याचा वाद झाला होता. या वादातून बदला घेण्यासाठी त्यांनी जबरी चोरीचा बेत आखल्याची कबुली दिली. करण वाघमोडेकडे सापडलेले दुचाकीही चोरीची असल्याचे तपासात पुढे आले असून, त्याने मित्राच्या मदतीने

Take four friends along and change it | चार मित्रांना सोबत घेऊन घेतला बदला --साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत

चार मित्रांना सोबत घेऊन घेतला बदला --साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत

googlenewsNext
ठळक मुद्देहॉटेल मालकाला धडा शिकविण्यासाठी जबरी चोरीएकाला अटक तिघे फरार

सातारा : हॉटेलमध्ये काम करत असताना मालकासोबत झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी हॉटेल कर्मचाºयाने मित्रांच्या सोबतीने हॉटेलमध्ये जबरी चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, अन्य तीघे अद्याप फरार आहेत.

करण धनाजी वाघमोडे (वय २०, रा. निमसोड, ता. खटाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गोडोली येथील हॉटेल मराठा पॅलेसमध्ये ३ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक चौघाजणांनी प्रवेश केला. त्यांच्या हातात तलवार, सुरा, गज, लाकडी दांडके होते. हॉटेलमधील कर्मचारी महेश मोरे यांना दमदाटी करून जबरदस्तीने काऊंटरवरमधील ८० हजारांची रोकड घेऊन संबंधितांनी पलायन केले होते. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनी तपासाला सुरूवात केली. त्यावेळी त्यांना  एका हॉटेलमध्ये या जबरी चोरीतील एक संशयित काम करत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार त्यांनी आपल्या टीमसह तेथे जाऊन करण वाघमोडे याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने आपल्या तीन साथीदारांसमवेत हॉटेल मराठा पॅलेसमध्ये जबरी चोरी केल्याचे सांगितले. याचे कारण विचारले असता. वाघमोडे याचा मित्र मराठा पॅलेसमध्ये पूर्वी काम करत होत्या. त्यावेळी त्याच्या मालकासोबत त्याचा वाद झाला होता. या वादातून बदला घेण्यासाठी त्यांनी जबरी चोरीचा बेत आखल्याची कबुली दिली. करण वाघमोडेकडे सापडलेले दुचाकीही चोरीची असल्याचे तपासात पुढे आले असून, त्याने मित्राच्या मदतीने गोडोलीतून ही दुचाकी चोरल्याचे पोलिसांना सांगितले. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, सहायक पोलीस उपनिरीक्षक डी. वाय. कदम, शिवाजी भिसे, धीरज कुंभार, अभय साबळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला.

Web Title: Take four friends along and change it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.